आम्ही ऋणी शिवरायांचे या ग्रुपतर्फे वंचित, उपेक्षित व निराधार लोकांसाठी एक घास गरिबांसाठी या उपक्रमांतर्गत दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.युवा उद्योजक व समाजसेवक सोमनाथ भिंगार्डे यांच्या गोरगरीब कष्टकरी जनतेबद्दलच्या कळवळीच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. दिवाळीचा सण सर्वांनाच गोड व्हावा, गरीबांच्या तोंडीही गोड घास जावा, या उद्देशाने हा फराळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी अनेक गरजू, निराधार व कष्टकरी बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी ग्रुपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .