शिवसेना तालुकाप्रमुखपदी प्रदीप बोराडे यांची नियुक्ती....
👤 मंठा प्रतिनिधी :- संदीप गायकवाड |
📅
15 November 2026 |
👁 36 Views
मंठा : खा. संजयजी जाधव , मा.मंत्री आ. अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. पाटील बोराडे यांचे सूचनेनुसार शिवसेना सचिव संजयजी मोरे यांच्या हस्ते शिवसेना नगरसेवक प्रदीप बोराडे यांची मंठा शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती जाहीर होताच मंठा तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.प्रदीप बोराडे यांची ही नियुक्ती मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे , परभणी लोकसभा संपर्कप्रमुख आनंद जाधव, जिल्हाप्रमुख तथा सभापती ए.जे. पाटील बोराडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किसनराव मोरे, माजी सभापती संतोष वरकड, परतूर तालुकाप्रमुख सुदर्शन सोळंके, उपजिल्हाप्रमुख धनंजय पोहेकर, तालुका संघटक तुळशीराम कुहिरे, शिवसेना शहर संघटक पप्पू दायमा सचिन चव्हाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.प्रदीप बोराडे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून जनसेवेचे काम करत असताना सर्वसामान्यांचे प्रश्न, शहरातील विकासकामे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यासाठी ते नेहमीच पुढे असतात. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर तालुकाप्रमुख पदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.