नागारा तलाव रामटेक जवळ पिकअप वाहनाच्या धडकेत 21 वर्षीय दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू

👤 नितिन बोरसरे, रामटेक | 📅 14 November 2026 | 👁 2 Views
नागारा तलाव रामटेक जवळ पिकअप वाहनाच्या धडकेत 21 वर्षीय दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू
भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना राखी तलाव परिसरातील नागरा तलावजवळ घडली. अपघातानंतर पसार झालेल्या पिकअपचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... प्रणय उमेश कोहपरे (वय २१, रा. बोंद्री, ता. मोहाडी, जि. भंडारा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे... प्राप्त माहितीनुसार, प्रणय हा आईला सावनेरजवळील येरणगाव येथे सोडून रामटेकमार्गे आपल्या गावी जात होता... सायंकाळी सुमारे ६.१५ वाजताच्या सुमारास नागरा तलावाजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या पिकअप वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली... प्रणय दुभाजकावर इतक्या जोराने आदळली की, त्याचे हेल्मेट तुटले... डोक्याला गंभीर दुखापत झाली...

दरम्यान, पिकअप वाहनचालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाला... त्याच मार्गाने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनचालकाने जखमी प्रणयला तातडीने रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले... मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले... रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना घटनेची माहिती दिली... पिकअप चालकाविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला... पोलीस पिकअप चालकाचा शोध घेत आहेत...
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
नागारा तलाव रामटेक जवळ पिकअप वाहनाच्या धडकेत 21 वर्षीय दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू | उरुण ईश्वरपुर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक श्री संभू आप्पा बावाफन यात्रा २० नोव्हेंबरपासून | आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते | रोटरॅक्ट क्लब ऑफ अमळनेरतर्फे १४ व १५ नोव्हेंबर रोजी भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन | सातपुड्याच्या कुशीत अंतर्नाद प्रतिष्ठानने उजळवला माणुसकीचा दीप! | चोपडा येथील शिवबाबा केंद्रात ९० दिप प्रज्वलित करून भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा..* | क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त भडगाव प्रशासन सज्ज; ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’च्या नियोजनासाठी तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!* | नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे सपरिवार रामटेक गडमंदिरात श्रीराम दर्शन | फटाक्यांऐवजी आरोग्याचा प्रकाश! सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा 'प्रदूषणमुक्त दिवाळी'चा निर्धार* | सांगली जिल्हा बँकेत माजी खासदार संजय पाटील यांचा विजय :माजी आमदार सुमन पाटील यांचा पराभव! |