उरुण ईश्वरपुर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक श्री संभू आप्पा बावाफन यात्रा २० नोव्हेंबरपासून

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 13 November 2026 | 👁 182 Views
उरुण ईश्वरपुर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक श्री संभू आप्पा बावाफन यात्रा २० नोव्हेंबरपासून
उरुण-ईश्वरपूर : उरुण-ईश्वरपूर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक संत (पीर) श्री संभुअप्पा बावाफन देवस्थानचा वार्षिक यात्रा उत्सव २० ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने धार्मिक विधी, रोजे, फकीर पूजन, भजन, पोवाडा आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रा उत्सवाच्या कार्यक्रमांची रूपरेषा पुढीलप्रमाणे :
- २० नोव्हेंबर (शुक्रवार) : मंडप चढविण्याचा कार्यक्रम.
- २० ते २४ नोव्हेंबर : रोजे (उपवास).
- २२ ते २४ नोव्हेंबर : फकीर होणे.
- २३ नोव्हेंबर (सोमवार) : गंधरात्र (संदल).
- २४ नोव्हेंबर (मंगळवार) : यात्रेचा मुख्य दिवस, पौर्णिमा व फकीर पूजन. सकाळी जय मल्हार एकतारी भजनी मंडळ, उरुण-ईश्वरपूर यांचा भजन कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वाजता शाहीर प्रसाद आदिनाथ विभुते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम होईल.
- २५ नोव्हेंबर (बुधवार) : सकाळी ९ वाजता पोलीस पाटील यांचा मानाचा गलफ व शासकीय गलफ कार्यक्रम. रात्री ८ वाजता श्री. बाळासाहेब चौधरी यांच्या आठवणीतील गाण्यांचा कार्यक्रम.
- २६ नोव्हेंबर (गुरुवार) : रात्री ८ वाजता श्री. बाळासाहेब चौधरी यांच्या आठवणीतील गाण्यांचा कार्यक्रम.
- २७ नोव्हेंबर (शुक्रवार) : रात्री ८ वाजता श्री. समीरभाई, विटा यांचा 'सरगम सदाबहार' गीतांचा कार्यक्रम.
या यात्रा उत्सवासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण ईश्वरपुर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक श्री संभू आप्पा बावाफन यात्रा २० नोव्हेंबरपासून | आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते | रोटरॅक्ट क्लब ऑफ अमळनेरतर्फे १४ व १५ नोव्हेंबर रोजी भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन | सातपुड्याच्या कुशीत अंतर्नाद प्रतिष्ठानने उजळवला माणुसकीचा दीप! | चोपडा येथील शिवबाबा केंद्रात ९० दिप प्रज्वलित करून भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा..* | क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त भडगाव प्रशासन सज्ज; ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’च्या नियोजनासाठी तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!* | नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे सपरिवार रामटेक गडमंदिरात श्रीराम दर्शन | फटाक्यांऐवजी आरोग्याचा प्रकाश! सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा 'प्रदूषणमुक्त दिवाळी'चा निर्धार* | सांगली जिल्हा बँकेत माजी खासदार संजय पाटील यांचा विजय :माजी आमदार सुमन पाटील यांचा पराभव! | कामेरी नाका खून प्रकरणातील दोघे आरोपी २४ तासांत जेरबंद; सांगली एलसीबी व ईश्वरपूर पोलिसांची संयुक्त कारवाई. |