जळगांव येथे "क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती" व "जनजातीय गौरव दिन" निमित्त आयोजित कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित...*

👤 पंकज कोळी जळगाव | 📅 15 November 2026 | 👁 10 Views
जळगांव येथे "क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती" व "जनजातीय गौरव दिन" निमित्त आयोजित कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित...*
*जळगांव येथे "क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती" व "जनजातीय गौरव दिन" निमित्त आयोजित कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित...*

*क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा* यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त तसेच *‘जनजातीय गौरव दिना’* च्या औचित्याने *जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव* येथे आयोजित कार्यक्रमास *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी उपस्थित राहून *भगवान बिरसा मुंडा* यांना विनम्र अभिवादन केले.

सदर कार्यक्रमास *राज्याचे मंत्री मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन* यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, यावल आदिवासी विकास विभागाचे अरुण पवार सर तसेच जळगावच्या तहसीलदार शीतल राजपूत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी आदिवासी महिला बचत गटांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी प्रोत्साहनपर प्रशस्तिपत्रे व धनादेशांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमातून आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला आणि स्वावलंबनाला निश्चितच बळ मिळेल.

*भगवान बिरसा मुंडा* यांनी आपल्या शौर्य, संघर्ष आणि अदम्य राष्ट्रप्रेमातून जनजातीय समाजाच्या स्वाभिमानासाठी व हक्कांसाठी दिलेला लढा संपूर्ण देशासाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार आणि कार्य पुढील पिढ्यांना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याची प्रेरणा देत राहतील.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
जळगांव येथे "क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती" व "जनजातीय गौरव दिन" निमित्त आयोजित कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित...* | यावल उपसा सिंचन योजनेला गती द्या — जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश | आदिवासी अस्मितेच्या लढ्याचे महानायक धरती आबा बिरसा मुंडा यांना अमळनेरमध्ये अभिवादन! | साईबाबा विद्यालयामध्ये १८ वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी जागवल्या जुन्या आठवणी | शिवसेना तालुकाप्रमुखपदी प्रदीप बोराडे यांची नियुक्ती.... | जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांना भूकंपाचे धक्के नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | नागारा तलाव रामटेक जवळ पिकअप वाहनाच्या धडकेत 21 वर्षीय दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू | उरुण ईश्वरपुर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक श्री संभू आप्पा बावाफन यात्रा २० नोव्हेंबरपासून | आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते | रोटरॅक्ट क्लब ऑफ अमळनेरतर्फे १४ व १५ नोव्हेंबर रोजी भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन |