रोटरॅक्ट क्लब ऑफ अमळनेरतर्फे १४ व १५ नोव्हेंबर रोजी भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
👤 मिलिंद वाणी जळगाव |
📅
12 November 2026 |
👁 8 Views
अमळनेर :प्रतिनिधी रोटरॅक्ट क्लब ऑफ अमळनेरच्या वतीने, अध्यक्ष वेन्की शर्मा यांच्या नेतृत्वाखाली, रोटरॅक्ट क्लब व वर्धमान ग्रुप यांच्या प्रायोजकत्वातून भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ व १५ नोव्हेंबर रोजी चोपडा रोडवरील मास्टर ब्लास्टर टर्फ येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेत एकूण १० संघ आणि ८० खेळाडू सहभागी होणार असून, विजेत्या संघाला २१ हजार रुपये रोख पारितोषिक, तर उपविजेत्या संघाला १५ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा प्रथमच लिलाव (Auction) पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. आभासी चलनाचा (Virtual Money) वापर करून खेळाडूंची निवड करत संघांची बांधणी करण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धेत अधिक उत्सुकता आणि रंगत निर्माण झाली आहे. याशिवाय, स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण YouTube वर करण्यात येणार असून, त्यामुळे क्रिकेटप्रेमींना घरबसल्या सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरॅक्ट क्लबचे सदस्य निधीश कोचर आणि वेद पाटील यांनी विशेष मेहनत घेतली असून, त्यांच्या योगदानामुळे स्पर्धेच्या आयोजनाला मोठी मदत झाली आहे.
अमळनेर शहरातील क्रीडाप्रेमींना एक वेगळा आणि आधुनिक क्रिकेटचा अनुभव देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला नागरिकांनी आणि क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन रोटरॅक्ट क्लब ऑफ अमळनेरतर्फे करण्यात आले आहे.