संपादक दिलीप राठी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; कारवाईसाठी बदनापूर पत्रकारांचे पोलिसांना निवेदन

👤 बदनापूर प्रतिनिधी :- नवनाथ गव्हाणे | 📅 18 November 2026 | 👁 7 Views
संपादक दिलीप राठी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; कारवाईसाठी बदनापूर पत्रकारांचे पोलिसांना निवेदन
जालना येथील 'दैनिक पार्श्वभूमी'चे संपादक दिलीप राठी यांना माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी बदनापूर शहर व तालुक्यातील पत्रकारांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात बुधवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी बदनापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, संपादक दिलीप राठी यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात असून, काही पत्रकारांच्या माध्यमातून त्यांच्याविरुद्ध तथ्यहीन व खोट्या तक्रारी दाखल करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि गैरप्रकार निर्भीडपणे जनतेसमोर मांडण्याचे काम करतात. मात्र, पत्रकारांना धमक्या देणे, खोट्या तक्रारींच्या माध्यमातून दबाव निर्माण करणे आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे ही गंभीर बाब असल्याचे पत्रकारांनी निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन दिलीप राठी यांना मिळालेल्या कथित धमकीची निष्पक्ष चौकशी करावी. तसेच, त्यांच्याविरुद्ध तक्रारी दाखल करणाऱ्यांचीही सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि त्यांना होणारा कथित मानसिक त्रास व दबाव थांबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनासोबत 'दैनिक पार्श्वभूमी'मध्ये प्रसिद्ध झालेल्या संबंधित बातमीचे कात्रणही जोडण्यात आले आहे. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या या निवेदनाद्वारे संबंधित प्रकरणात योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
या निवेदनावर सिकंदर अली (दैनिक भास्कर), सय्यद रफीक अली (दैनिक पार्श्वभूमी), अदील खान (दैनिक जनश्वास), संजय उनगे (दैनिक देशोन्नती), शिकुर बेग, नवनाथ गव्हाणे (दैनिक धर्मयोद्धा), सय्यद जलील (दैनिक लोकआनंद), भागवत पवार (दैनिक पुढारी), यकीन शेख (न्यूज नेशन 81), जे. व्ही. शेख (दैनिक पुण्यनगरी), शिवप्रसाद दाड (दैनिक तरुण भारत), आनंद इंदानी (दैनिक सकाळ), नजीर इनामदार (दैनिक लोकमत समाचार), किशोर सिरसाठ (दैनिक नायक) यांच्यासह बदनापूर शहर व तालुक्यातील अनेक पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संपादक दिलीप राठी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; कारवाईसाठी बदनापूर पत्रकारांचे पोलिसांना निवेदन | नानेगावच्या अखंड हरिनाम सप्ताहाला मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट! | देवस्थान इनाम जमीनधारक शेतकऱ्यांचा २५ नोव्हेंबरला एल्गार; महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर 'थाळी बजाव' आंदोलन | पाचोरा-भडगावच्या राजकारणात मोठी घडामोड; डॉ. पूनम प्रशांत पाटील यांच्या उमेदवारी कायम | ऊसतोड मजुरांच्या पालावर फुलवली माणुसकीची दिवाळी; स्वरा फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक | बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंठा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप | महिलांच्या प्रसूतीची गोपनीय माहिती सायबर भामट्यांकडे! पाडूळीत ९९ हजारांची ऑनलाइन लूट | जळगावची ऐतिहासिक परंपरा असलेला रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर यांची पाहणी | न्यायदानाचा कणा आज संपावर: भडगाव न्यायालयात 'कामबंद' आंदोलनाचा पहिला दिवस!* | घरातील वायर कट करताना शॉक लागून आई आणि मुलाचा मृत्यू |