मंठा : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
युवासेना तालुकाप्रमुख तथा धर्मवीर संभूराजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मंठा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डिगांबर बोराडे यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी अनंता वैद्य (जिल्हा समन्वयक, जालना), देविदास खरात (शिवसेना उपतालुकाप्रमुख, मंठा), प्रल्हाद सिरसाठ, रझाद भाई केधळीकर, प्रल्हादराव कदम, संभाजी घारे, नवनाथ ढेगळे (युवासेना उपतालुकाप्रमुख), गोपी गायकवाड (युवासेना शहरप्रमुख), दत्ता काळे (युवासेना तालुका सचिव), सिद्धेश्वर खंदारे, मनु गिरी, संतोष शेंडगे, आवेश पठाण, माऊली खरात (युवासेना उपतालुकाप्रमुख) तसेच ज्ञानेश्वर खंदारे आदी युवासेना व शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करत रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून सामाजिक सेवा आणि रुग्णांप्रती संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला.