नानेगावच्या अखंड हरिनाम सप्ताहाला मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट!

👤 बदनापूर प्रतिनिधी :- नवनाथ गव्हाणे | 📅 18 November 2026 | 👁 4 Views
नानेगावच्या अखंड हरिनाम सप्ताहाला मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट!
बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या आगमनाने नानेगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नानेगाव फाटा येथे पंचक्रोशीतील भाविक, ग्रामस्थ आणि मराठा बांधवांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.
नानेगाव येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता भक्तिमय वातावरणात होत असून, यानिमित्त सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ह.भ.प. स्वामी विश्वनाथ गिरीजी महंत महाराज यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. कीर्तनातून महाराजांनी उपस्थित भाविकांना आध्यात्मिक विचारांचे मार्गदर्शन केले. या धार्मिक सोहळ्याला मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थिती लावली.
या भेटीतील विशेष आकर्षण ठरली ती नानेगाव येथील मराठा सेवक अंकुश चव्हाण यांची कन्या कार्तिक अंकुश चव्हाण. या चिमुकलीने मनोज जरांगे पाटील यांचे सुंदर छायाचित्र स्वतःच्या हाताने रेखाटले होते. हे छायाचित्र तिने मनोजदादांना भेट देऊन आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. चिमुकलीच्या या अनोख्या भेटीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. स्वतःचे रेखाटलेले छायाचित्र पाहून मनोज जरांगे पाटील यांनीही आनंद व्यक्त केला.
यावेळी मराठा सेवक अंकुश भाऊ चव्हाण, प्रशांत चव्हाण यांच्यासह पंचक्रोशीतील मराठा सेवक, भाविक भक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक परंपरा, सामाजिक एकजूट आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी ग्रामस्थांच्या मनातील जिव्हाळा या भेटीच्या निमित्ताने पाहायला मिळाला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संपादक दिलीप राठी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; कारवाईसाठी बदनापूर पत्रकारांचे पोलिसांना निवेदन | नानेगावच्या अखंड हरिनाम सप्ताहाला मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट! | देवस्थान इनाम जमीनधारक शेतकऱ्यांचा २५ नोव्हेंबरला एल्गार; महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर 'थाळी बजाव' आंदोलन | पाचोरा-भडगावच्या राजकारणात मोठी घडामोड; डॉ. पूनम प्रशांत पाटील यांच्या उमेदवारी कायम | ऊसतोड मजुरांच्या पालावर फुलवली माणुसकीची दिवाळी; स्वरा फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक | बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंठा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप | महिलांच्या प्रसूतीची गोपनीय माहिती सायबर भामट्यांकडे! पाडूळीत ९९ हजारांची ऑनलाइन लूट | जळगावची ऐतिहासिक परंपरा असलेला रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर यांची पाहणी | न्यायदानाचा कणा आज संपावर: भडगाव न्यायालयात 'कामबंद' आंदोलनाचा पहिला दिवस!* | घरातील वायर कट करताना शॉक लागून आई आणि मुलाचा मृत्यू |