पाचोरा-भडगावच्या राजकारणात मोठी घडामोड; डॉ. पूनम प्रशांत पाटील यांच्या उमेदवारी कायम

👤 शुभम सुराणा जळगाव | 📅 17 November 2026 | 👁 252 Views
पाचोरा-भडगावच्या राजकारणात मोठी घडामोड; डॉ. पूनम प्रशांत पाटील यांच्या उमेदवारी कायम
(विषेश प्रतिनिधी भडगाव )

पाचोरा : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा-भडगाव तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. डॉ. पूनम प्रशांत पाटील यांच्या भाजपकडून उमेदवारीबाबत सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील संचालक पदांच्या जागांवरून स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा होती. नातेसंबंधातून उमेदवारी दिल्याने मराठा समाजातील काही घटकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर अमोल शिंदे यांनी डॉ. पूनम पाटील यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव पुढे केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नाराज शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील चर्चेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
या घडामोडीनंतर मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी परिस्थिती समजून घेत डॉ. पूनम पाटील यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिल्याचा दावा व्हायरल पोस्टमधून करण्यात येत आहे.
त्यामुळे पाचोरा-भडगावच्या राजकीय समीकरणांमध्ये नवे वळण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपकडून डॉ. पूनम प्रशांत पाटील यांच्या उमेदवारीबाबतच्या या चर्चेला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
देवस्थान इनाम जमीनधारक शेतकऱ्यांचा २५ नोव्हेंबरला एल्गार; महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर 'थाळी बजाव' आंदोलन | पाचोरा-भडगावच्या राजकारणात मोठी घडामोड; डॉ. पूनम प्रशांत पाटील यांच्या उमेदवारी कायम | ऊसतोड मजुरांच्या पालावर फुलवली माणुसकीची दिवाळी; स्वरा फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक | बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंठा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप | महिलांच्या प्रसूतीची गोपनीय माहिती सायबर भामट्यांकडे! पाडूळीत ९९ हजारांची ऑनलाइन लूट | जळगावची ऐतिहासिक परंपरा असलेला रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर यांची पाहणी | न्यायदानाचा कणा आज संपावर: भडगाव न्यायालयात 'कामबंद' आंदोलनाचा पहिला दिवस!* | घरातील वायर कट करताना शॉक लागून आई आणि मुलाचा मृत्यू | भडगाव नगरपरिषदेच्या दिरंगाईविरोधात नागरिकाचा एल्गार, भोगवट्याच्या जागेच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण सुरू | जळगाव शहरात एकाच वेळी तीन घरं फोडण्याचा प्रयत्न |