घनसावंगी : तालुक्यातील पाडूळी खुर्द येथे सायबर भामट्यांनी शासकीय योजनेचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाला तब्बल ९९ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, फसवणूक करणाऱ्यांकडे गावातील प्रसूती झालेल्या महिलांची नावे आणि फोटो उपलब्ध असल्याने महिलांच्या वैयक्तिक व गोपनीय माहितीच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाडूळी खुर्द येथील विष्णू दिगंबर नाईक (वय २८) यांना सायबर भामट्यांनी प्रथम व्हिडिओ कॉल केला. प्रसूती झालेल्या महिलांच्या खात्यावर शासनाकडून मिळणारे अनुदान जमा होण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. फॉर्म न भरल्यास शासकीय योजनेचे पैसे मिळणार नाहीत, अशी बतावणी करण्यात आली.