न्यायदानाचा कणा आज संपावर: भडगाव न्यायालयात 'कामबंद' आंदोलनाचा पहिला दिवस!*

👤 शुभम सुराणा जळगाव | 📅 17 November 2026 | 👁 108 Views
न्यायदानाचा कणा आज संपावर: भडगाव न्यायालयात 'कामबंद' आंदोलनाचा पहिला दिवस!*

भडगाव ( विशेष प्रतिनिधी):

नामदार उच्च न्यायालयातील न्यायिक कर्मचाऱ्यांप्रमाणेच दुय्यम न्यायालयातील न्यायिक कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवार, दि. १७ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपाच्या पहिल्याच दिवशी भडगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील सर्व कर्मचारी वृंद या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याने न्यायालयीन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.
"हक्क मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील!"
महाराष्ट्र राज्यातील समस्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. संपाच्या पहिल्या दिवशी भडगाव न्यायालय परिसरात आंदोलनाचा फलक लावून कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "चार संघटना - एकच निर्धार! हक्क मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील!" आणि "कर्मचारी एकजुटीचा विजय असो!" अशा ठाम निर्धाराने कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.
चार प्रमुख संघटनांची वज्रमूठ:
या बेमुदत संपात राज्यातील चार प्रमुख कर्मचारी संघटनांनी एकत्र येत एकजूट दाखवली आहे. यामध्ये:
* महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ (गट क)
* महाराष्ट्र स्टेट ज्युडिशियल स्टेनोग्राफर्स असोसिएशन
* महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलीफ कर्मचारी महासंघ
* महाराष्ट्र राज्य न्यायालयीन गट ड कर्मचारी महासंघ
या चारही संघटनांच्या आवाहनानुसार भडगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवला आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांनी कामबंद ठेवल्याने पक्षकार आणि वकिलांची कामे खोळंबली असून, जोपर्यंत सुधारित वेतनश्रेणीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
देवस्थान इनाम जमीनधारक शेतकऱ्यांचा २५ नोव्हेंबरला एल्गार; महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर 'थाळी बजाव' आंदोलन | पाचोरा-भडगावच्या राजकारणात मोठी घडामोड; डॉ. पूनम प्रशांत पाटील यांच्या उमेदवारी कायम | ऊसतोड मजुरांच्या पालावर फुलवली माणुसकीची दिवाळी; स्वरा फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक | बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंठा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप | महिलांच्या प्रसूतीची गोपनीय माहिती सायबर भामट्यांकडे! पाडूळीत ९९ हजारांची ऑनलाइन लूट | जळगावची ऐतिहासिक परंपरा असलेला रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर यांची पाहणी | न्यायदानाचा कणा आज संपावर: भडगाव न्यायालयात 'कामबंद' आंदोलनाचा पहिला दिवस!* | घरातील वायर कट करताना शॉक लागून आई आणि मुलाचा मृत्यू | भडगाव नगरपरिषदेच्या दिरंगाईविरोधात नागरिकाचा एल्गार, भोगवट्याच्या जागेच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण सुरू | जळगाव शहरात एकाच वेळी तीन घरं फोडण्याचा प्रयत्न |