जळगाव शहरात एकाच वेळी तीन घरं फोडण्याचा प्रयत्न

👤 पंकज कोळी जळगाव | 📅 17 November 2026 | 👁 132 Views
जळगाव शहरात एकाच वेळी तीन घरं फोडण्याचा प्रयत्न
जळगाव, ( प्रतिनिधी ) :- जळगाव शहरातील गिरणा पंपिंग रस्त्यावरील श्यामनगर परिसरात चोरट्यांनी एकाचवेळी तीन बंद घरांना लक्ष्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये घरमालक बाहेरगावी असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरांची कुलुपे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सहभागी असलेले मंकी कॅपधारी तीन संशयित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले आहेत. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
​​ही घटना रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्यामनगर परिसरात घडली. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अनेक कुटुंबे बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. तीन घरांची कुलुपे तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
​सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयित मंकी कॅप घालून घरांच्या परिसरात फिरताना दिसत आहेत. त्यातील एकाने कटरच्या साहाय्याने कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला यश आले नाही. त्यानंतर दुसऱ्या संशयिताने कटरच्या मदतीने कुलूप कापण्याचा प्रयत्न केला. तिसरा संशयित हातात बॅटरी घेऊन परिसरावर लक्ष ठेवताना दिसत आहे. तिघांनी समन्वयाने चोरीचा प्रयत्न केल्याचे फुटेजमधून दिसून येते.
​घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे. संशयितांनी चेहरे झाकलेले असल्याने त्यांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
​दरम्यान, ज्या तीन घरांना लक्ष्य करण्यात आले, त्या घरांचे मालक बाहेरगावी असल्याने घरातील ऐवज चोरीला गेला आहे किंवा नाही, याची अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. घरमालक परतल्यानंतर तपासणी केल्यावर नुकसानीचा नेमका तपशील समोर येणार आहे.
​सणासुदीच्या काळात बंद घरांना लक्ष्य करून चोरीचे प्रयत्न होत असल्याने नागरिकांनी घरांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
देवस्थान इनाम जमीनधारक शेतकऱ्यांचा २५ नोव्हेंबरला एल्गार; महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर 'थाळी बजाव' आंदोलन | पाचोरा-भडगावच्या राजकारणात मोठी घडामोड; डॉ. पूनम प्रशांत पाटील यांच्या उमेदवारी कायम | ऊसतोड मजुरांच्या पालावर फुलवली माणुसकीची दिवाळी; स्वरा फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक | बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंठा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप | महिलांच्या प्रसूतीची गोपनीय माहिती सायबर भामट्यांकडे! पाडूळीत ९९ हजारांची ऑनलाइन लूट | जळगावची ऐतिहासिक परंपरा असलेला रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर यांची पाहणी | न्यायदानाचा कणा आज संपावर: भडगाव न्यायालयात 'कामबंद' आंदोलनाचा पहिला दिवस!* | घरातील वायर कट करताना शॉक लागून आई आणि मुलाचा मृत्यू | भडगाव नगरपरिषदेच्या दिरंगाईविरोधात नागरिकाचा एल्गार, भोगवट्याच्या जागेच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण सुरू | जळगाव शहरात एकाच वेळी तीन घरं फोडण्याचा प्रयत्न |