भडगाव नगरपरिषदेच्या दिरंगाईविरोधात नागरिकाचा एल्गार, भोगवट्याच्या जागेच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण सुरू

👤 विजय माळी भडगाव (जळगाव ) | 📅 17 November 2026 | 👁 58 Views
भडगाव नगरपरिषदेच्या दिरंगाईविरोधात नागरिकाचा एल्गार, भोगवट्याच्या जागेच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण सुरू


भडगाव प्रतिनिधी

भडगाव नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता क्रमांक ३०११ मधील भोगवट्याच्या जागेवरील कायदेशीर हक्कांबाबत नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने स्थानिक रहिवासी अविनाश श्रीकांत देशमुख यांनी दि. १६ रोजी सकाळी ११ वाजे पासुन नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मागणी मान्य होईपर्यंत शांततेच्या व लोकशाही मार्गाने हे उपोषण सुरूच राहील, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. याबाबतचे लेखी निवेदन व पूर्वसूचना त्यांनी दिनांक २ नोव्हेंबर रोजी भडगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सादर केली होती.
दिलेल्या निवेदनानुसार, भडगाव नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता क्रमांक ३०११ येथील भोगवट्याच्या जागेसंदर्भात योग्य ती चौकशी करून नियमानुसार कार्यवाही व्हावी व सदर जागेचा प्रत्यक्ष ताबा मिळावा, यासाठी देशमुख यांनी यापूर्वीच नगरपरिषदेकडे लेखी अर्ज आणि त्यानंतर स्मरण अर्ज सादर केले होते. मात्र, अर्ज सादर करून एक महिन्याहून अधिक कालावधी उलटल्यानंतरही नगरपरिषद प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही किंवा अर्जाच्या सद्यस्थितीबाबत लेखी स्वरूपात कळविण्यात आलेले नाही. वारंवार प्रत्यक्ष भेटून व लेखी पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आपल्याला विनाकारण मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन मालमत्ता क्रमांक ३०११ मधील भोगवट्याच्या जागेची सविस्तर चौकशी करावी, संबंधित अभिलेख व कागदपत्रांची तपासणी करून नियमानुसार निर्णय घ्यावा, जागेचा प्रत्यक्ष ताबा द्यावा तसेच पूर्वीच्या अर्जावर काय कार्यवाही झाली याची लेखी माहिती द्यावी, अशा प्रमुख मागण्या देशमुख यांनी केल्या आहेत. विहित कालावधीत प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर त्यांनी आज सोमवार दिनांक १६ नोव्हेंबरपासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
दरम्यान, या आंदोलनाची रीतसर पूर्वसूचना माहितीस्तव जिल्हाधिकारी (जळगाव), प्रांताधिकारी (पाचोरा-भडगाव), तहसीलदार (भडगाव) आणि भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आली होती. आता उपोषण सुरू झाल्यानंतर तरी नगरपरिषद प्रशासन या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन उपोषणकर्त्याला न्याय देते का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
देवस्थान इनाम जमीनधारक शेतकऱ्यांचा २५ नोव्हेंबरला एल्गार; महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर 'थाळी बजाव' आंदोलन | पाचोरा-भडगावच्या राजकारणात मोठी घडामोड; डॉ. पूनम प्रशांत पाटील यांच्या उमेदवारी कायम | ऊसतोड मजुरांच्या पालावर फुलवली माणुसकीची दिवाळी; स्वरा फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक | बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंठा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप | महिलांच्या प्रसूतीची गोपनीय माहिती सायबर भामट्यांकडे! पाडूळीत ९९ हजारांची ऑनलाइन लूट | जळगावची ऐतिहासिक परंपरा असलेला रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर यांची पाहणी | न्यायदानाचा कणा आज संपावर: भडगाव न्यायालयात 'कामबंद' आंदोलनाचा पहिला दिवस!* | घरातील वायर कट करताना शॉक लागून आई आणि मुलाचा मृत्यू | भडगाव नगरपरिषदेच्या दिरंगाईविरोधात नागरिकाचा एल्गार, भोगवट्याच्या जागेच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण सुरू | जळगाव शहरात एकाच वेळी तीन घरं फोडण्याचा प्रयत्न |