चोपडा येथील शिवबाबा केंद्रात ९० दिप प्रज्वलित करून भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा..*

👤 मिलिंद वाणी चोपडा {जळगाव } | 📅 12 November 2026 | 👁 19 Views
चोपडा येथील शिवबाबा केंद्रात ९० दिप प्रज्वलित करून भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा..*

*चोपडा (प्रतिनिधी):-* राजस्थान मधील माउंटआबू स्थित प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मधुबनच्या स्थापनेला ९० वर्ष पूर्ण झाल्याने चोपडा येथील ओमशांती नगरमधील शिवबाबा केंद्रात बलिप्रतिपदा पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ९० दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात व आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. यावेळी शिवबाबा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी मंगलादीदी यांनी मुरली वाचनातून सर्व आत्मे परमात्म्याची लेकरे असून विश्वबंधुत्व, आत्मिक, एकता, शांती, प्रेम आणि निस्वार्थ भावनेचा संदेश दिला. दीप प्रज्वलानातून अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञान सद्भावना आणि सकारात्मकतेचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात पसरावा, असाही संकल्प करण्यात आला. कार्यक्रमात अध्यात्मिक चिंतनासह भाऊबीज सणाचे महत्त्व विशद करण्यात आले. उत्साह, भक्तीभाव आणि आनंदमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ब्रम्हाकुमारी शितलदिदी, सारिका दीदी, करिष्मा दिदी यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी शेकडों भाई-बहिणींची उपस्थिती होती.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते | रोटरॅक्ट क्लब ऑफ अमळनेरतर्फे १४ व १५ नोव्हेंबर रोजी भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन | सातपुड्याच्या कुशीत अंतर्नाद प्रतिष्ठानने उजळवला माणुसकीचा दीप! | चोपडा येथील शिवबाबा केंद्रात ९० दिप प्रज्वलित करून भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा..* | क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त भडगाव प्रशासन सज्ज; ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’च्या नियोजनासाठी तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!* | नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे सपरिवार रामटेक गडमंदिरात श्रीराम दर्शन | फटाक्यांऐवजी आरोग्याचा प्रकाश! सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा 'प्रदूषणमुक्त दिवाळी'चा निर्धार* | सांगली जिल्हा बँकेत माजी खासदार संजय पाटील यांचा विजय :माजी आमदार सुमन पाटील यांचा पराभव! | कामेरी नाका खून प्रकरणातील दोघे आरोपी २४ तासांत जेरबंद; सांगली एलसीबी व ईश्वरपूर पोलिसांची संयुक्त कारवाई. | स्वामी विवेकानंद आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह, देवलापार येथील सोळा वर्षीय विद्यार्थी बेपत्ता |