ट्रक अडवून नऊ लाखांचा दरोडा; उमदी पोलिसांकडून चौघांना अटक : १७ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

👤 संतोष एडके तासगाव | 📅 16 September 2026 | 👁 26 Views
ट्रक अडवून नऊ लाखांचा दरोडा; उमदी पोलिसांकडून चौघांना अटक :  १७ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त


दैनिक आखूर / संतोष एडके तासगाव

जत : तिकोंडी-संख मार्गावर ट्रक अडवून चालक व त्याच्या साथीदारांना मारहाण करून नऊ लाख रुपये रोख आणि मोबाईल लुटून पसार झालेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा उमदी पोलिसांनी छडा लावला. गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी चौघांना अटक केली. आरोपींकडून १३ लाख रुपये रोख, गावठी कट्टा, जिवंत काडतूस, चाकू, तीन दुचाकी आणि पाच मोबाईल असा एकूण १७ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. ११ सप्टेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास तिकोंडी ते संख जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर भिवर्गी फाट्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हा दरोडा पडला. तामिळनाडूतील एम. रवी (वय ६०, व्यवसाय शेळ्या-मेंढ्यांचा व्यापार) हे ट्रकमधून जात असताना अज्ञात आरोपींनी ट्रक अडवला.
आरोपींनी रवी व त्यांच्या साथीदारांना हाताने मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेल्या शेखर यांना गणासदृश हत्याराने मारहाण करून गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चाकूसदृश हत्याराचा धाक दाखवत ट्रकच्या केबिनमधील लाकडी बॉक्स टॉमीच्या सहाय्याने फोडून त्यातील नऊ लाख रुपये रोख आणि दोन मोबाईल जबरदस्तीने काढून घेत आरोपी पसार झाले. याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी तीन तपास पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला.
दरम्यान, पोहेकॉ करे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करून दरोड्यातील अज्ञात आरोपी निष्पन्न केले.
त्यानुसार गणेश बिराप्पा पांढरे (वय २१, रा. मुंजेवस्ती पांढरेवाडी), शांताराम बसवंत शिंदे (वय ३०, रा. आसंगी तुर्क), गौरव दादासो चौगुले (वय २३) आणि आकाश पाराप्पा नेमाणे (वय २३, दोघे रा. कुलाळवाडी, ता. जत) यांना अटक करण्यात आली. याप्रकरणातील अन्य तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
१३ लाखांची रोकड, कट्टा-काडतूस आणि तीन दुचाकी जप्त
अटक आरोपींकडून १३ लाख रुपये रोख, ४० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, चाकू, तीन दुचाकी आणि पाच अँड्रॉइड मोबाईल असा एकूण १७ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक श्री तुषार दोषी साहेब
अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर मॅडम
श्री सचिन थोरबोले
उपविभागीय पोलीस अधिकारी, जत विभाग, जत
पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली
यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे, प्रभारी अधिकारी; सहाय्यक पोलीस निरीक्षक निशाणदार, स्थानिक गुन्हे शाखा सांगली; पोलीस उपनिरीक्षक बंडू साळवे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश धसाडे, पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गायकवाड, पोहेकॉ बंडगर, पोहेकॉ मासाळ, पोहेकॉ कांबळे, पोहेकॉ माने, पोना नरळे, पोकॉ कुंभरे, पांढरे, पोकॉ माळी, पोकॉ कोकाटे, पोकॉ तोरकड, पोकॉ मोटे, पोकॉ स्वामी, चालक पोकॉ खोत, चालक पोकॉ घोडके, तसेच पोहेकॉ करे, करण परदेशी, सायबर शाखा सांगली, पोहेकॉ कोळेकर, पोहेकॉ खरात, पोहेकॉ लवटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी कारवाई केली.
अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमदी पोलिसांकडून सुरू आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ट्रक अडवून नऊ लाखांचा दरोडा; उमदी पोलिसांकडून चौघांना अटक : १७ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त | काळाचा घाला! पिकअपला दुचाकीची धडक; वडिलांसह सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत आई गंभीर जखमी; | कॅप्सूलमधून एमडीची तस्करी; ९६५ ग्रॅम ड्रग्जसह एक जेरबंद सांगली एलसीबीची विट्यात कारवाई; ४२.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त. | उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त |