चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

👤 संतोष एडके तासगाव | 📅 05 September 2026 | 👁 87 Views
चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला
४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
तासगाव : चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी तासगावात आलेल्या २० वर्षीय तरुणाला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने सापळा रचून जेरबंद केले. त्याच्याकडून ४२ ग्रॅम वजनाचे, ६ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई २ सप्टेंबर रोजी तासगाव कॉलेज ते भिलवडी बायपास मार्गावर करण्यात आली.
सिध्दार्थ संजय गुरव (वय २०, रा. साळसिंगे रोड, विटा, ता. खानापूर, जि. सांगली) असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३८५/२०२६, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या संशयितांवर कारवाई करून असे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व पथक तासगाव परिसरात पेट्रोलिंग करीत होते.
दरम्यान, पोलीस हवालदार सागर टिंगरे, दरिबा बंडगर आणि सतीश माने यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक संशयित इसम चोरीचे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी तासगाव कॉलेज ते भिलवडी बायपास मार्गावरील एमएसईबी कार्यालयासमोर येणार आहे.
माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने एमएसईबी कार्यालयाच्या अलीकडे सापळा रचला. काही वेळाने संशयास्पदरीत्या एक तरुण तेथे थांबलेला दिसून आला. पोलिसांनी त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव सिध्दार्थ गुरव असल्याचे सांगितले.
पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात सोन्याचे दागिने आढळून आले. पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता हे दागिने गव्हाण येथील रोहन लक्ष्मण गुरव यांच्या घरातून चोरी केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
तासगाव पोलीस ठाण्यातील अभिलेखाची पडताळणी केली असता रोहन गुरव यांच्या फिर्यादीवरून सदर चोरीप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडील नेकलेस, चैन, मिनी गंठण, कानातील कर्णफुले, अंगठी व बदाम असे एकूण ४२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पंचांसमक्ष जप्त केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार तसेच एलसीबीच्या पथकाने केली.
आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात | जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल | जळगावात खून, दुचाकीचा किरकोळ वादातून तरुणाची हत्या, एक जखमी | मानापूर येथे श्रीराम सेनेतर्फे रावण वध; सूर्पणखेचाही वध | गुंडेवाडीतील खूनप्रकरणी सांगली एलसीबीची धडाकेबाज कामगिरी; मुख्य संशयितासह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात | ईश्वरपुरात रेकॉर्डवरील आरोपी पिस्तुलासह जेरबंद : सांगली एलसीबीची कारवाई. ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त; विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल. | पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मुद्रित जाहिरातींसाठी MCMC प्रमाणपत्र बंधनकारक - डॉ. मैनाक घोष |