काळाचा घाला! पिकअपला दुचाकीची धडक; वडिलांसह सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत आई गंभीर जखमी;

👤 संतोष एडके तासगाव | 📅 16 September 2026 | 👁 119 Views
काळाचा घाला! पिकअपला दुचाकीची धडक; वडिलांसह सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत आई गंभीर जखमी;


दैनिक आखुर / संतोष एडके तासगाव

तासगाव-मणेराजुरी मार्गावरील भीषण अपघाताने चिंचणी-वासुंबे परिसर हादरला


तासगाव : तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर ब्रम्हनाथ मंदिर वासुंबे हद्दीत रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पिकअप वाहनाला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वडील सागर जाधव (वय अंदाजे ४०) आणि त्यांची अवघी सहा वर्षांची मुलगी हर्षिता यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात सागर जाधव यांच्या पत्नी सोनाली जाधव गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, चिंचणी येथील रहिवासी आणि सध्या सरस्वती नगर वासुंबे येथे वास्तव्यास असलेले द्राक्ष बागायतदार व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्री बाबुराव जाधव यांचे पुत्र सागर जाधव हे मुलगी हर्षिता हिला दुचाकीवरून घेऊन तासगाव-मणेराजुरी मार्गावरील एका शाळेत पत्नी सोनाली यांना घेण्यासाठी गेले होते. शाळेतून पत्नीला सोबत घेऊन तिघेही दुचाकीवरून परतत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअपला दुचाकीची जोरदार धडक झाली.
धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सागर जाधव आणि हर्षिता यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सोनाली जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत.
चिमुकलीच्या मृत्यूने हळहळ
अवघ्या सहा वर्षांच्या हर्षिताचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. वडील आणि चिमुकल्या मुलीचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे चिंचणी, वासुंबे आणि तासगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघाताबाबतची अधिकृत माहिती, जखमी सोनाली जाधव यांची प्रकृती आणि पुढील कायदेशीर कार्यवाहीची माहिती संबंधित यंत्रणेकडून मिळणे बाकी आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ट्रक अडवून नऊ लाखांचा दरोडा; उमदी पोलिसांकडून चौघांना अटक : १७ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त | काळाचा घाला! पिकअपला दुचाकीची धडक; वडिलांसह सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत आई गंभीर जखमी; | कॅप्सूलमधून एमडीची तस्करी; ९६५ ग्रॅम ड्रग्जसह एक जेरबंद सांगली एलसीबीची विट्यात कारवाई; ४२.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त. | उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त |