मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 08 September 2026 | 👁 14 Views
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले
सांगली, दि. 8 : मतदार यादी त्रुटीविरहित व अचूक करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षणाचे काम प्रभावीपणे पूर्ण करावे. एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही, याची विशेष दक्षता घेत मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीने राबवावी, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण 2026 कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्यासह निवडणूक विभागातील अधिकारी उपस्थित होते.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून 30 सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती नोंदवता येणार आहेत. दावे व हरकतींवरील कार्यवाही पूर्ण करून 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओ यांनी प्रभावी समन्वय ठेवून कालबद्ध कार्यक्रमानुसार काम पूर्ण करावे. दावे व हरकतींची सुनावणी मतदारांच्या सोयीच्या ठिकाणी घेऊन त्यांची गैरसोय टाळावी, अशा सूचनाही तेली-उगले यांनी दिल्या.एकगठ्ठा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, तसेच कागदपत्र पडताळणीसाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्वीप उपक्रमांतर्गत मतदारांमध्ये व्यापक जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला.
बैठकीनंतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात आली. मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच एकाच कुटुंबातील मतदार शक्यतो एकाच मतदान केंद्रावर राहावेत, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |