कॅप्सूलमधून एमडीची तस्करी; ९६५ ग्रॅम ड्रग्जसह एक जेरबंद सांगली एलसीबीची विट्यात कारवाई; ४२.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त.

👤 संतोष एडके तासगाव | 📅 15 September 2026 | 👁 9 Views
कॅप्सूलमधून एमडीची तस्करी; ९६५ ग्रॅम ड्रग्जसह एक जेरबंद सांगली एलसीबीची विट्यात कारवाई; ४२.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त.



दैनिक आखुर / संतोष एडके

विटा : कॅप्सूलमधून मेफॅड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या संशयिताला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) विटा येथे जेरबंद केले. त्याच्याकडून ९६५ ग्रॅम एमडीसह दोन मोबाईल आणि अल्टो कार असा एकूण ४२ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दत्तात्रय अंकुश पाखरे (वय ३२, रा. हिवरे, ता. खानापूर, जि. सांगली) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४५०/२०२६, एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २१(क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमली पदार्थांच्या विक्री, तस्करी व साठ्याविरोधात कारवाई करण्याच्या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कारवाई करीत होते. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकातील पोहेकॉ. सूर्यकांत साळुंखे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दत्तात्रय पाखरे हा एमडी विक्रीसाठी विटा-तासगाव रस्त्यावरील श्री. मंगल कार्यालयासमोर पांढऱ्या चारचाकी वाहनातून येणार आहे.
या माहितीची खात्री करून पथकाने पंच, वजनकाटाधारक व फोटोग्राफरसह घटनास्थळी सापळा रचला. पांढऱ्या अल्टो कारमधून आलेल्या पाखरेला पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनाची झडती घेतली. ड्रायव्हर सीटखाली प्लॅस्टिकच्या पिशवीत ९६५ ग्रॅम फिकट पिवळसर पावडर, तर डिक्कीमध्ये लाल-पांढऱ्या रंगाच्या रिकाम्या कॅप्सूलची पिशवी आढळली. तपासणीत पावडर एमडी असल्याचे निष्पन्न झाले.
चौकशीत पाखरे याने मुंबई विमानतळावरून कतारला बॅग पोहोचविण्याचे काम मिळाले होते, मात्र तो कतारला न जाता बॅग घेऊन गावी परतल्याचे सांगितले. त्यानंतर कॅप्सूल फोडून त्यातील एमडी पावडर वेगळी करून विक्रीच्या उद्देशाने विट्यात आणल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात केरळमधील अब्दुल निझार मोईद्दीन कुणी ऊर्फ आदिलखान आणि मोहम्मद शेमीर ऊर्फ समीर यांची नावे समोर आली असून, त्यांच्या भूमिकेचा तपास सुरू आहे. अंमली पदार्थ तस्करीतील बॅकवर्ड-फॉरवर्ड लिंकेज तपासले जात असून, आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहा.पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजीव झाडे करीत आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
कॅप्सूलमधून एमडीची तस्करी; ९६५ ग्रॅम ड्रग्जसह एक जेरबंद सांगली एलसीबीची विट्यात कारवाई; ४२.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त. | उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी |