चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त

👤 संतोष एडके तासगाव | 📅 03 September 2026 | 👁 179 Views
चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त


सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत सात गुन्ह्यांत पाहिजे व परागंदा असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीला ताब्यात घेतले. विशाल ऊर्फ मुक्या भिमराव पवार (वय ३५, रा. बहादुरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ४० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन नक्षीदार बांगड्या, किंमत ६ लाख २ हजार ७६० रुपये, जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी आष्टा ते नागांव रस्त्यावर करण्यात आली.
मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व पथक आष्टा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
दरम्यान, पोकों संकेत कानडे, अभिजीत माळकर, ऋषीकेश सदामते व विनायक सनदी यांना गोपनीय बातमीदारामार्फत विशाल ऊर्फ मुक्या पवार हा चोरीचे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी आष्टा ते नागांव रस्त्यावर थांबलेला असल्याची माहिती मिळाली.
पथकाने तत्काळ आष्टा ते नागांव रस्त्यावर सापळा रचला. सह्याद्री मल्टीपर्पज लॉन्ससमोर एक संशयित इसम आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात सोन्याच्या दोन बांगड्या आढळून आल्या.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, आरोपीने सुमारे एक वर्षापूर्वी साथीदारांसह मर्दवाडी येथे एका घराची कौले काढून घरात प्रवेश करून तिजोरी फोडून चोरी केल्याची माहिती दिली. या चोरीतील आपल्या वाट्याला आलेल्या सोन्याच्या दोन बांगड्या विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले.
पोलिसांनी संबंधित गुन्ह्याच्या अभिलेखाची पडताळणी केली असता, त्याची माहिती गुन्ह्याशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडील सोन्याच्या दोन बांगड्या पंचांसमक्ष जप्त केल्या.
जप्त केलेल्या सोन्याच्या बांगड्यांपैकी १९ ग्रॅम ९५९ मिली वजनाच्या बांगडीची किंमत २ लाख ९९ हजार ३८५ रुपये, तर २० ग्रॅम २२५ मिली वजनाच्या बांगडीची किंमत ३ लाख ३ हजार ३७५ रुपये आहे. दोन्ही मिळून ६ लाख २ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सात गुन्ह्यांत होता पाहिजे आरोपी
विशाल ऊर्फ मुक्या पवार हा पलूस, आष्टा, कुरळप व कुंडल पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या सात गुन्ह्यांत पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर जबरी चोरी, घरफोडी यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी दोन वेळा मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत त्याच्यावर दरोडा, खून, जबरी चोरी, घरफोडी यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी आष्टा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, पुढील तपास आष्टा पोलीस ठाणे करीत आहे.
कारवाईतील अधिकारी व अंमलदार
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, सपौफो अमित परीट, पोहेकॉ अमोल पैदाळे, रणजीत जाधव, प्रकाश पाटील, पोना श्रीधर बागडी, पोकों अभिजीत माळकर, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, रोहन घस्ते, केरुबा चव्हाण, सुरज थोरात, विनायक सनदी, पोकों विजय पाटणकर तसेच कॅप्टन गुंडवाडे, सांगली सायबर पोलीस ठाणे यांनी सहभाग घेतला.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी आष्टा पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असुन पुढील तपास आष्टा पोलीस ठाणे करीत आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |