तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन,

👤 संतोष एडके तासगाव | 📅 03 September 2026 | 👁 92 Views
तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको  सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन,


तासगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि

मनोज जरांगे - पाटील यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी उद्या दिनांक 4 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता तासगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने आज तासगाव पोलीस स्टेशनला याबाबत पूर्वकल्पना देणारे निवेदन देण्यात आले आहे. तासगाव पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, हे आंदोलन पूर्णपणे शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने एस.टी. स्टँड चौक, तासगाव येथे केले जाईल.

आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारची सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेची हानी हो
णार नाही आणि कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, अशी ग्वाही समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.

तसेच रुग्णवाहिका, अग्निशामक दल, शाळकरी मुले आणि इतर अत्यावश्यक सेवांना कोणताही अडथळा येणार नाही, त्यांना त्वरित मार्ग काढून दिला जाईल.

आंदोलनामुळे तासगाव एस.टी. स्टँड परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

असे आवाहनही करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात | जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल | जळगावात खून, दुचाकीचा किरकोळ वादातून तरुणाची हत्या, एक जखमी | मानापूर येथे श्रीराम सेनेतर्फे रावण वध; सूर्पणखेचाही वध | गुंडेवाडीतील खूनप्रकरणी सांगली एलसीबीची धडाकेबाज कामगिरी; मुख्य संशयितासह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात | ईश्वरपुरात रेकॉर्डवरील आरोपी पिस्तुलासह जेरबंद : सांगली एलसीबीची कारवाई. ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त; विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल. | पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मुद्रित जाहिरातींसाठी MCMC प्रमाणपत्र बंधनकारक - डॉ. मैनाक घोष |