तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

👤 संतोष एडके तासगाव | 📅 03 September 2026 | 👁 67 Views
तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी
तासगाव : तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत सध्या भाजपचा आमदार नसल्याने कार्यकर्ते व नागरिकांच्या संघटनात्मक, वैयक्तिक तसेच सार्वजनिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भाजपच्या चार आमदारांपैकी एका आमदाराची पालक आमदार म्हणून नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी तासगाव भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. विशेषतः जत विधानसभा मतदारसंघाचे अभ्यासू व आक्रमक आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व सोपवावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

क्रांती सहकारी साखर कारखाना, कुंडल येथे झालेल्या सांगली जिल्हा भाजप ग्रामीण कार्यकारिणीच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. पक्षनिरीक्षक विक्रम पावसकर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, वैभव पाटील, चिमण डांगे, शरद लाड आदी उपस्थित होते. आगामी ग्रामपंचायत, कवठेमहांकाळ नगरपंचायत, पदवीधर व शिक्षक मतदारसंघ तसेच लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही तालुक्यांतील भाजप संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पालक आमदाराची आवश्यकता असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तासगाव आणि कवठेमहांकाळ येथे भाजपची अद्ययावत कार्यालये असून, तासगाव तालुकाध्यक्ष अॅड. स्वप्निल पाटील आणि कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे संघटनात्मक जाळे मजबूत
लढवल्या आहेत. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असल्याने स्थानिक पातळीवर जनतेच्या पक्षाकडून अपेक्षा वाढल्या असून, त्या पूर्ण करण्यासाठी प्रभावी नेतृत्वाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी तासगाव व कवठेमहांकाळ या दोन्ही तालुक्यांमध्ये लक्ष घालून संघटनात्मक कामाला गती दिली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच लवकरच दोन्ही तालुक्यांमध्ये कार्यक्रम घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. बैठकीस तासगाव तालुक्यातून भाजप तालुकाध्यक्ष अॅड. स्वप्निल पाटील, जिल्हा सरचिटणीस लोंढे सर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनंजय शिंदे, आजम मकानदार, सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, सरचिटणीस श्रीकांत मोहिते, नारायण बंडगर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आशुतोष भोसले, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष अश्विनी प्रशांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |