पीएसीएल पर्ल्स गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची सूचना; बँक खात्यांच्या दुरुस्तीसाठी सेबी पोर्टल पुन्हा सुरू

👤 ईश्वरपुर प्रतिनिधी राहुल टिबे | 📅 07 May 2026 | 👁 236 Views
पीएसीएल पर्ल्स गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची सूचना; बँक खात्यांच्या दुरुस्तीसाठी सेबी पोर्टल पुन्हा सुरू
(पर्ल्स) कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही वर्षांपूर्वी पीएसीएल अर्थात पर्ल्स कंपनीने अचानकपणे गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यास टाळाटाळ करत देशभरातील आपली कार्यालये बंद केली होती. यामुळे लाखो गुंतवणूकदारांसह कंपनीमध्ये काम करणाऱ्या फिल्ड वर्कर्समध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी जनलोक प्रतिष्ठान सामाजिक संघटना, पुणे यांच्या वतीने सर्व फिल्ड वर्कर्स व गुंतवणूकदारांना एकत्र करून न्यायालयीन लढा उभारण्यात आला. त्यानंतर सेबी संस्थेने निवृत्त न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी विशेष समिती स्थापन केली होती.
सेबीकडून यासाठी एक ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले होते. या पोर्टलवर गुंतवणूकदारांनी आवश्यक कागदपत्रांसह पैसे परत मिळण्यासाठी बँक खात्याची माहिती भरली होती. दरम्यानच्या काळात अनेक वर्षे उलटल्यानंतर काही गुंतवणूकदारांची बँक खाती व्यवहाराअभावी किंवा इतर कारणांमुळे बंद झाली आहेत. ज्यांची खाती सुरू आहेत अशा अनेक गुंतवणूकदारांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत.
मात्र, ज्या गुंतवणूकदारांच्या बँक खात्यांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत, त्यांना दुरुस्तीची संधी देण्यासाठी सेबीचे पोर्टल दिनांक ७ मे २०२६ ते ६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
तरी सर्व पीएसीएल पर्ल्स गुंतवणूकदारांनी आपल्या बँक खात्याची व कागदपत्रांची आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन जनलोक प्रतिष्ठान सामाजिक संघटना, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |