वारणा धरणात २८.८९ टी.एम.सी. पाणीसाठा; कोयने, अलमट्टीसह प्रमुख धरणांतील विसर्ग सुरू
👤 संतोष एडके तासगाव |
📅
28 July 2026 |
👁 19 Views
जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी ८ वाजेपर्यंत २८.८९ टी.एम.सी. पाणीसाठा असून, या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे : कोयना ८०.०९ (१०५.२५), धोम ११.१९ (१३.५०), कन्हेर ९.२४ (१०.१०), धोमबलकवडी ३.५६ (४.०८), उरमोडी ८.६० (९.९७), तारळी ४.७३ (५.८५), वारणा २८.८९ (३४.४०), राधानगरी ७.७६ (८.३६), दूधगंगा १४.२८ (२५.४०), तुळशी २.६४ (३.४७), कासारी २.२० (२.७७), पाटगांव २.४० (३.७२), अलमट्टी ११७.८८ (१२३).
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे आहे : कण्हेर धरणातून ३६५७, धोम बलकवडी ९६१, उरमोडी १०००, तारळी २०५, वारणा ३४००, राधानगरी १४०० व अलमट्टी धरणातून २० हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.
विविध पुलांच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे नोंदवली गेली : आयर्विन पूल सांगली ११.९ (४०) व अंकली पूल हरिपूर १७.२ (४५.११).