सांगलीत ३० जुलै रोजी जिल्हास्तरीय रोजगार मेळावा; मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, बँकिंगसह विविध क्षेत्रांत ५०८ जागांवर भरती
👤 संतोष एडके तासगाव |
📅
28 July 2026 |
👁 51 Views
सांगली जिल्ह्यातील रोजगारइच्छुक युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या वतीने गुरुवार, दिनांक ३० जुलै २०२६ रोजी येथील श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी, आयटी/बीपीओ, बँकिंग व फायनान्स सर्व्हिस तसेच इतर विविध क्षेत्रांतील १९ नामांकित आस्थापना व कंपन्यांच्या माध्यमातून ५०८ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त रोजगारइच्छुक युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ऑनलाईन नोंदणी आवश्यक :
रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/PsfNy355gaG1D5JA8 या गुगल फॉर्मद्वारे आपली ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना सर्व माहिती अचूक भरून मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी योग्य नमूद करावा, तसेच नोंदणी केल्यानंतर मेळाव्याबाबतची पुढील माहिती मोबाईल क्रमांकावर कळविण्यात येईल, असे यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दिनांक : ३० जुलै २०२६
स्थळ : श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली
अधिक माहितीसाठी संपर्क : (०२३३) २९९०३८३
ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांनी केले आहे.