महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार २०२६ ने ज्येष्ठ शिक्षिका सौ. नाथलीन पावलू फर्नांडिस यांचा गौरव..

👤 श्रीरामपूर | गौरव डेंगळे | 📅 28 July 2026 | 👁 203 Views
महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार २०२६ ने ज्येष्ठ शिक्षिका सौ. नाथलीन पावलू फर्नांडिस यांचा गौरव..
सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव येथील ज्येष्ठ शिक्षिका, मार्गदर्शक व समाजसेविका सौ. नाथलीन पावलू फर्नांडिस यांची 'महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार २०२६' या राज्यस्तरीय प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था, अहिल्यानगर (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो. शिक्षण क्षेत्रातील दीर्घकालीन, गुणवत्तापूर्ण आणि समाजाभिमुख योगदानाची दखल घेत सौ. नाथलीन पावलू फर्नांडिस यांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.सौ. फर्नांडिस यांनी गेली ३६ वर्षे शिक्षण क्षेत्रात निःस्वार्थ, मूल्याधिष्ठित आणि विद्यार्थीकेंद्रित सेवा दिली आहे. त्यांचा जन्म व शिक्षण कर्नाटकातील बेळगाव येथे झाले असून, गेली तीन दशकांहून अधिक काळ त्या श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव येथे ज्येष्ठ शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. आपल्या प्रभावी अध्यापनशैली, विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम, शिस्त, संवेदनशीलता आणि नैतिक मूल्यांच्या जोपासनेमुळे त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत यापूर्वीही त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये सोमैया विद्याविहार, मुंबई यांचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (२०१४ व २०१७), दिव्य भारती यांचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (२०१६), बेशाब लूर्ड डॅनियल, नाशिक यांचा सर्वोत्कृष्ट समाजसेविका पुरस्कार (२०१६) तसेच आदिशक्ती मंचचा बेस्ट वूमन ऑफ द इयर पुरस्कार यांचा समावेश आहे.
त्यांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान, "शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान देणे नव्हे, तर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या चारित्र्याची जडणघडण करणे आणि जबाबदार नागरिक घडविण्याची एक सर्जनशील प्रक्रिया आहे," हे त्यांच्या संपूर्ण कार्यातून प्रतिबिंबित होते.
या उल्लेखनीय यशाबद्दल श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री. के. एल. वाकचौरे, उपप्राचार्या सौ. शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका सौ. प्रज्ञा पहाडे, सौ. पल्लवी ससाणे, तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सौ. नाथलीन पावलू फर्नांडिस यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
"गरिबांची साथ हीच माझी ताकद; म्हणूनच दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत" – महादेव जानकर | सांगलीत ३० जुलै रोजी जिल्हास्तरीय रोजगार मेळावा; मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, बँकिंगसह विविध क्षेत्रांत ५०८ जागांवर भरती | धनंजय मुंडे यांच्या दूरदृष्टीतून साकारले १५ कोटींचे भव्य 'शेतकरी भवन' व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय | वारणा धरणात २८.८९ टी.एम.सी. पाणीसाठा; कोयने, अलमट्टीसह प्रमुख धरणांतील विसर्ग सुरू | गुरुपौर्णिमेनिमित्त मायणीच्या मातोश्री सरुताई मठात उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन. | महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार २०२६ ने ज्येष्ठ शिक्षिका सौ. नाथलीन पावलू फर्नांडिस यांचा गौरव.. | ए.आय. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकाचे उत्पादन वाढून भरीव आर्थिक फायदा- हर्षवर्धन पाटील | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. |