धनंजय मुंडे यांच्या दूरदृष्टीतून साकारले १५ कोटींचे भव्य 'शेतकरी भवन' व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय

👤 डॉ संकेत सानप मुंबई | 📅 28 July 2026 | 👁 167 Views
धनंजय मुंडे यांच्या दूरदृष्टीतून साकारले १५ कोटींचे भव्य 'शेतकरी भवन' व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय

बीड | प्रतिनिधी
जिल्ह्याच्या विकासासाठी केवळ घोषणा नव्हे, तर दूरदृष्टी आणि प्रभावी निर्णयक्षमतेची आवश्यकता असते. याचाच प्रत्यय माजी पालकमंत्री व माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यातून पुन्हा एकदा आला आहे.
कोरोना काळात पालकमंत्री म्हणून जिल्हा कृषी विभागाच्या अत्यंत मोडकळीस आलेल्या कार्यालयांची पाहणी करताना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विभागाची विविध कार्यालये एकाच छताखाली आणणारी आधुनिक व प्रशस्त इमारत उभारण्याची संकल्पना धनंजय मुंडे यांनी मांडली. त्यांच्या पुढाकारातून हा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आणि मंजुरीही मिळाली.
त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना या प्रकल्पासाठी तब्बल ₹१५ कोटींचा निधी उपलब्ध करून देत त्यांनी या स्वप्नाला प्रत्यक्ष आकार दिला. आज अत्याधुनिक सुविधा असलेले जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय आणि शेतकरी भवन अंतिम टप्प्यात असून, लवकरच ते शेतकरी व नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
या भव्य वास्तेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी सेवा, मार्गदर्शन आणि शासकीय कामांसाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च यांची मोठी बचत होणार आहे.
श्रेयवादापासून कायम दूर राहून विकासाला प्राधान्य देणाऱ्या धनंजय मुंडे यांनी उभारलेली ही वास्तू त्यांच्या विकासात्मक दूरदृष्टीची आणि शेतकरीहिताच्या बांधिलकीची कायमस्वरूपी साक्ष देत राहील. नाव असो वा नसो, जिल्ह्याच्या विकासात त्यांच्या योगदानाची ही भव्य इमारत कायम स्मरण करून देणारी ठरणार आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
"गरिबांची साथ हीच माझी ताकद; म्हणूनच दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत" – महादेव जानकर | सांगलीत ३० जुलै रोजी जिल्हास्तरीय रोजगार मेळावा; मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, बँकिंगसह विविध क्षेत्रांत ५०८ जागांवर भरती | धनंजय मुंडे यांच्या दूरदृष्टीतून साकारले १५ कोटींचे भव्य 'शेतकरी भवन' व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय | वारणा धरणात २८.८९ टी.एम.सी. पाणीसाठा; कोयने, अलमट्टीसह प्रमुख धरणांतील विसर्ग सुरू | गुरुपौर्णिमेनिमित्त मायणीच्या मातोश्री सरुताई मठात उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन. | महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार २०२६ ने ज्येष्ठ शिक्षिका सौ. नाथलीन पावलू फर्नांडिस यांचा गौरव.. | ए.आय. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकाचे उत्पादन वाढून भरीव आर्थिक फायदा- हर्षवर्धन पाटील | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. |