युवरंग २०२६ वर मुळजी जेठा महाविद्यालयाची मोहोर; चोपडा महाविद्यालय उपविजेतेपदी!

👤 न्यूज डेस्क | 📅 31 October 2026 | 👁 242 Views
युवरंग २०२६ वर मुळजी जेठा महाविद्यालयाची मोहोर; चोपडा महाविद्यालय उपविजेतेपदी!
युवरंग २०२६ वर मुळजी जेठा महाविद्यालयाची मोहोर; चोपडा महाविद्यालय उपविजेतेपदी!

डेस्क | जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘युवारंग २०२६’ आणि दिव्यांग महोत्सवाचा उत्साहात समारोप झाला. विविध कला व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मुळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले. तर महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा यांनी सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले.

महोत्सवात विविध कला, सांस्कृतिक आणि सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळाली. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण महोत्सवात उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

माजी विद्यार्थ्याच्या हस्ते पारितोषिक वितरण ठरले खास आकर्षण

यंदाच्या ‘युवारंग २०२६’ महोत्सवातील विशेष लक्षवेधी क्षण म्हणजे युवारंगाचा माजी विद्यार्थी हेमंत पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ज्या व्यासपीठावर एकेकाळी विद्यार्थी म्हणून सहभाग घेतला, त्याच व्यासपीठावर आज माजी विद्यार्थी म्हणून विजेत्यांना सन्मानित करण्याची संधी मिळणे, ही अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब ठरली.

विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारा, आत्मविश्वास वाढवणारा आणि विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना एकत्र आणणारा ‘युवारंग २०२६’ महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
भडगाव येथे AEG फाउंडेशनच्या वतीने कृषी उद्योजकांना प्रमाणपत्रांचे वितरण . | युवरंग २०२६ वर मुळजी जेठा महाविद्यालयाची मोहोर; चोपडा महाविद्यालय उपविजेतेपदी! | एका क्षणात होत्याचे नव्हते! भरधाव कारचा भीषण अपघात; तेलंगणातील चालकाचा दुर्दैवी अंत, तिघे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे | रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देणाऱ्या कुचीच्या वैभव सरवदे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित! | कुचीमध्ये विहिरीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; गावात खळबळ! | न्यायालयाचे ‘कायदेशीर कवच’ विद्यार्थ्यांच्या दारात: भडगावमध्ये ‘सुरक्षित बचपन’ अभियानाचा दिमाखदार समारोप! | 39 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुंबई पोलीस दलातील PSI संजय टिबे सेवानिवृत्त | शिवसेनेच्या दोन तर भाजपच्या एका उमेदवाराची संचालकपदी निवड; पारोळा, एरंडोल आणि भुसावळमध्ये बिनविरोध विजय | सागवान लाकूड चोरी रोखण्यासाठी गेलेल्या वनमजुरावर कुऱ्हाडीने हल्ला; दोन्ही हातांवर केले वार! | ‘दरिया’ नव्हे ‘समंदर’ शोधा; दुष्काळाचे भान आणि समतेच्या जागरानं कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात ‘युवारंग २०२६’ चा रणगजर! |