जळगाव विषेश प्रतिनिधी
दि. २८ ऑक्टोबर : ‘सामाजिक, समता आणि समरसता’ वर्ष या संकल्पनेवर आधारित यंदा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव ‘युवारंग २०२६’ आणि दिव्यांग कला महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यदलाचे सदस्य तथा केशव स्मृती सेवा समुह संस्थेचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी समाजामध्ये समतेचा आणि समानतेचा जागर करण्याचे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.
यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, तर उद्घाटक डॉ. भरत अमळकर, प्रमुख अतिथी आयडीबीआय बँकेचे जनरल मॅनेजर पंकज पाटील, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, स्वागताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, कार्याध्यक्ष ॲङ अमोल पाटील, विद्यार्थी विकास समन्वयक समितीचे अध्यक्ष नितीन झाल्टे, यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. एस.एस. राजपूत, प्राचार्य प्रा. जगदीश पाटील, प्राचार्य डॉ. संजय सुराणा, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, प्रा. महेंद्र रघुवंशी, डॉ. पवित्रा पाटील, प्रा. उज्ज्वल पाटील, प्राचार्य प्रा. साहेबराव भुकन, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, सीए रविंद्र पाटील, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ प्रा. योगेश पाटील, माजी विद्यार्थी संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, श्रीमती नेहा जोशी, दिनेश चव्हाण, सुनील निकम, भानुदास येवलेकर, प्रा. विजय प्रकाश शर्मा, दिनेश खरात, श्रीमती स्वप्नाली महाजन (काळे), डॉ. संजय पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रवीण महाले मंचावर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यदलाचे सदस्य तथा केशव स्मृती सेवा समुह संस्थेचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर म्हणाले की, मोठमोठे कलावंत युवारंग महोत्सवातून पुढे आले आहेत. एक नाटक माणसाच्या जीवनामध्ये अदभूत बदल घडवू शकतो असे म्हणत नाना पाटेकर आणि माऊंटनमॅन दशरथ मांझी (बिहार) यांचे उदाहरणे देत युवारंगाकडे डोळसपणे बघण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच युवारंगमधून करिअर घडविण्याच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. मनस्थितील बदल, शिकण्याची संधी युवारंगाच्या माध्यमातून मिळते ती संधी गमावू नका जीवनाच सोनं करा असेही आवाहन त्यांनी केले.
प्रमुख अतिथी आयडीबीआय बँकेचे जनरल मॅनेजर पंकज पाटील यांनी मनाला आनंद वाटेल त्या क्षेत्रात करिअर करावे असे सांगितले. स्वागताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे म्हणाले की, भारतातील जेनझी रचनात्मक दृष्टीने विचार करतो त्यामुळे अशा युवक महोत्सवातून समतेचा आणि समरसतेचा संदेश पोहचविण्यासाठी राष्ट्रपुरूषांचे स्मरण करून त्यांचे विचार आत्मसात करण्याचा मौलिक सल्ला त्यांनी यावेळी दिला.
कार्याध्यक्ष ॲङ अमोल पाटील यांनी युवारंग-२०२६ मागील भूमिका विषद केली. कलाविष्कारातून नवनवीन विचार प्रकट व्हावेत यासाठी युवारंगाच्या माध्यमातून सामाजिक संदेश पोहचविण्याचा प्रयत्न विद्यापीठाने केला आहे. दुष्काळी पार्श्वभूमीवर कमीत कमी खर्चात युवारंग अधिकाधिक चांगला करण्याचा प्रयत्न असून उर्वरीत बचतीतून विद्यार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न आहे. कलाविष्कार करत दुष्काळी पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सामाजिक संवेदना प्रकट व्हाव्यात युवारंगातून सामाजिक, समता व समरसतेचा संदेश पोहचवावा यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी ‘मंजिल से आगे बढकर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर अशी सुरुवात करताच उपस्थित युवकांनी टाळयांच्या गजरात दाद दिली. या प्रा. माहेश्वरी यांनी युवारंगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या प्रतिभेला चालना मिळते. तसेच उर्जा, उत्साह आणि योग्य दिशा मिळत असल्याचे सांगून पदवी सोबत कौशल्य आत्मसात करा, वेळेला महत्व द्या, चांगल्या मित्रांची संगत करा, शिस्त पाळा, परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जा असा मौलीक सल्ला त्यांनी यावेळी दिला. प्रास्ताविकात विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. प्रवीण महाले यांनी युवारंगची भूमिका विषद केली. सुत्रसंचालन प्रा. विना महाजन व खेमराज पाटील यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांना युवारंग महोत्सवाच्या शिस्तीबाबत रितीशा पवार यांनी तर नशामुक्ती बाबत प्रा. प्रवीण महाले यांनी उपस्थितांना शपथ दिली. या उद्घाटन समारंभास अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य व विविध समित्यांचे अध्यक्ष, सचिव व सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येन उपस्थित होते.
उद्घटनानंतर पाचही रंगामंचाचे उद्घाटन करण्यात आले. रंगमंच क्र. १ महात्मा फुले सभागृहाचे उद्घाटन व्य.प. सदस्य तथा स्वागातध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, कार्याध्यक्ष ॲङ अमोल पाटील, डॉ. उज्ज्वल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रंगमंच क्र. २ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन अधिष्ठाता प्राचार्य डॉ. एस.एस. राजपूत, प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील, सीए रवींद्र पाटील, रंगमंच क्र. ३ शाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहाचे उद्घाटन अधिष्ठाता प्राचार्य डॉ. जगदीश पाटील, प्रा. सुरेखा पालवे, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील, रंगमंच क्र. ४ संत रविदास सभागृहाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. संजय सुराणा, ॲड. नितीन झाल्टे, अधिष्ठात प्रा. अनिल डोंगरे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांच्या हस्ते तर रंगमंच क्र. ५ संत गाडगेबाबा सभागृहाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी, प्रा. पवित्रा पाटील, अधिष्ठाता प्रा. साहेबराव भुकन,विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. प्रवीण महाले यांच्या हस्ते करण्यात आले.
…………………………………………………………………………………………………………………………………