न्यायालयाचे ‘कायदेशीर कवच’ विद्यार्थ्यांच्या दारात: भडगावमध्ये ‘सुरक्षित बचपन’ अभियानाचा दिमाखदार समारोप!

👤 शुभम सुराणा जळगाव | 📅 31 October 2026 | 👁 133 Views
न्यायालयाचे ‘कायदेशीर कवच’ विद्यार्थ्यांच्या दारात: भडगावमध्ये ‘सुरक्षित बचपन’ अभियानाचा दिमाखदार समारोप!
बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण व्हावे आणि त्यांच्या वैधानिक हक्कांची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने भडगाव तालुका विधी सेवा समिती आणि भडगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘सुरक्षित बचपन अभियान’ या देशव्यापी कायदेविषयक जनजागृती सप्ताहाचा अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या समारोप झाला. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मे. दिवाणी व फौजदारी न्यायालय (कनिष्ठ स्तर), भडगाव यांच्या आदेशान्वये ही मोहीम प्रभावीपणे पार पडली.
शाळांमध्ये कायदेशीर मंथन व मार्गदर्शन
दिनांक २६ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान शहरातील शाळांमध्ये विविध कायदेशीर संकल्पनांवर आधारित विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण सप्ताहात प्रमुख वक्ते म्हणून न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. अभिजीत दायमा यांच्यासह ॲड. घनश्याम मोरे, ॲड. समाधान सोनवणे, ॲड हेमंत कुलकर्णी,ॲड,निलेश तिवारी, ॲड. पी. जी. सोनवणे, डॉ. सुवर्णा पाटील, ॲड. आर. के. वाणी, ॲड. गणेश वेलसे, ॲड. ए. डी. बाग, ॲड. रोहित मिसर व ॲड. लोकेश म्हसकी यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण (POCSO कायदा, २०१२), सायबर सुरक्षा, बालविवाह प्रतिबंध व बालकामगार प्रतिबंधक कायदे यांविषयी सोप्या व ओघवत्या भाषेत माहिती देण्यात आली. तसेच कोणत्याही अन्यायाविरुद्ध किंवा शोषणाविरुद्ध न घाबरता ‘बोलो, बताओ, बचाओ’ या तत्त्वावर निर्भयपणे कायदेशीर दाद मागण्याचे आवाहन मान्यवरांनी विद्यार्थ्यांना केले.
मान्यवरांची उपस्थिती, सूत्रसंचालन व आभार
सौ. सुमनताई गिरधर पाटील विद्यालयात संपन्न झालेल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती छाया बिर्‍हाडे होत्या. या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन पर्यवेक्षक तायडे सर, सोनजे सर व देवेंद्र पाटील सर यांनी केले.
तसेच लाडकुबाई विद्या मंदिरातील सत्राच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली पाटील मॅडम उपस्थित होत्या. याप्रसंगी उपमुख्याध्यापिका सीमा सैंदाणे, आहेर सर, श्रीमती सपना देवरे मॅडम उपस्थित होते, तर सूत्रसंचालन देवल जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. अभिजीत दायमा यांनी मानले.
नियोजन व सहकार्य
या देशव्यापी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी अयाज मुल्ला, विवेक गर्गे, सुगी पाटील तसेच लाडकुबाई विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण सप्ताहाचे नेटके नियोजन व मार्गदर्शन तालुका विधी सेवा समितीचे समांतर विधी सहाय्यक श्री. दिपक मोतीराम मराठे, श्री. विठ्ठल कौतिक पाटील तसेच श्री. विजय देशपांडे व डॉ. ईश्वर परदेशी,मयुरी पाटील यांनी केले.
मे. न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयीन यंत्रणेने चार भिंतींच्या बाहेर पडून थेट विद्यार्थ्यांच्या दारात जाऊन राबविलेल्या या अभिनव व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे शिक्षण, विधी व सामाजिक वर्तुळातून सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
भडगाव येथे AEG फाउंडेशनच्या वतीने कृषी उद्योजकांना प्रमाणपत्रांचे वितरण . | युवरंग २०२६ वर मुळजी जेठा महाविद्यालयाची मोहोर; चोपडा महाविद्यालय उपविजेतेपदी! | एका क्षणात होत्याचे नव्हते! भरधाव कारचा भीषण अपघात; तेलंगणातील चालकाचा दुर्दैवी अंत, तिघे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे | रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देणाऱ्या कुचीच्या वैभव सरवदे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित! | कुचीमध्ये विहिरीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; गावात खळबळ! | न्यायालयाचे ‘कायदेशीर कवच’ विद्यार्थ्यांच्या दारात: भडगावमध्ये ‘सुरक्षित बचपन’ अभियानाचा दिमाखदार समारोप! | 39 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुंबई पोलीस दलातील PSI संजय टिबे सेवानिवृत्त | शिवसेनेच्या दोन तर भाजपच्या एका उमेदवाराची संचालकपदी निवड; पारोळा, एरंडोल आणि भुसावळमध्ये बिनविरोध विजय | सागवान लाकूड चोरी रोखण्यासाठी गेलेल्या वनमजुरावर कुऱ्हाडीने हल्ला; दोन्ही हातांवर केले वार! | ‘दरिया’ नव्हे ‘समंदर’ शोधा; दुष्काळाचे भान आणि समतेच्या जागरानं कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात ‘युवारंग २०२६’ चा रणगजर! |