बँक ऑफ महाराष्ट्रची ३ कोटींची फसवणूक; ९ वर्षे १० महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; इस्लामपूर येथील बनावट सातबारा प्रकरण

👤 संतोष एडके तासगाव | 📅 27 October 2026 | 👁 75 Views
बँक ऑफ महाराष्ट्रची ३ कोटींची फसवणूक; ९ वर्षे १० महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद  सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; इस्लामपूर येथील बनावट सातबारा प्रकरण
बँक ऑफ महाराष्ट्रच्या इस्लामपूर शाखेची बनावट सातबारा उतारे व खोटे शिक्के वापरून ३ कोटी २ लाख १४ हजार ८१८ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या ९ वर्षे १० महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला सांगलीच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. राजेंद्र रामचंद शिंदे (वय ५२, रा. हाळभाग, वाळवा, जि. सांगली) यास अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) पहाटे करण्यात आली.

इस्लामपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक २७४/२०१७ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ व ३४ नुसार गुन्हा दाखल आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या इस्लामपूर शाखेत जमिनीची प्रत्यक्ष मालकी कमी असतानाही अधिक जमीन असल्याचे दर्शविणारे बनावट सातबारा उतारे व खोटे शिक्के तयार करण्यात आले होते. तसेच काही आरोपींकडे जमीन नसतानाही जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून ती बँकेत सादर करण्यात आली. या प्रकारातून बँकेची एकूण ३ कोटी २ लाख १४ हजार ८१८ रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात एकूण ८० आरोपींनी संगनमत केल्याचा उल्लेख पोलिसांच्या प्रसिद्धिपत्रकात करण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांतील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक स्वाती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.

या पथकातील अधिकाऱ्यांना गोपनीय बातमीदारामार्फत राजेंद्र शिंदे हा रात्री-अपरात्री आपल्या हाळभाग, वाळवा येथील घरी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याच्या घरी जाऊन खात्री केली आणि त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव राजेंद्र रामचंद शिंदे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

पोलीस उपअधीक्षक स्वाती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, सहायक पोलीस फौजदार रमेश कोळी, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप मोरे, विशाल भिसे आणि पोलीस नाईक सचिन मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अटकेनंतर पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर करीत आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
बँक ऑफ महाराष्ट्रची ३ कोटींची फसवणूक; ९ वर्षे १० महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; इस्लामपूर येथील बनावट सातबारा प्रकरण | अंतर्नाद प्रतिष्ठानचा सेवेचा दीप उजळतोय अकराव्या वर्षात ! ‘वाटीभर फराळ’ उपक्रमातून वंचितांची दिवाळी गोड करणार | भडगाव तहसीलदार कारवाईसाठी जात असताना अपघातात जखमी | रामटेक गडमंदिरात पारंपरिक काकड आरती महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ | अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता, अपहृत मुली, महिला व पुरुषांचा लावला यशस्वी शोध | रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात | जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल |