ट्रॅक्टर अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू एडगाव-आंबेडी येथील दुर्घटना ; तालुक्यात हळहळ...

👤 तुषार शिंगाडे | 📅 04 October 2026 | 👁 147 Views
ट्रॅक्टर अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू एडगाव-आंबेडी येथील दुर्घटना ; तालुक्यात हळहळ...
वैभववाडी ( तुषार शिंगाडे)

ट्रॅक्टरचा पुढील टायर अचानक फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात करुळ-भोयडेवाडी येथील रुपेश हनुमंत पाटील (वय 40) यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एडगाव-आंबेडी येथे घडली. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

रुपेश पाटील हे आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर (एमएच 07- एएस -7812) घेऊन वैभववाडीहून करुळच्या दिशेने जात होते. राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना एडगाव-आंबेडी नजीक ट्रॅक्टरचा पुढील टायर अचानक फुटला. त्यामुळे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून तो रस्त्याच्या उजव्या बाजूच्या गटारात जाऊन आदळला. या अपघातात रुपेश पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील युवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी खासगी वाहनातून रुपेश यांना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. करुळ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रुपेश पाटील यांच्या आकस्मिक निधनाने करुळ-भोयडेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, भावजय, पुतणे, बहीणी असा परिवार आहे. या अपघाताचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ट्रॅक्टर अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू एडगाव-आंबेडी येथील दुर्घटना ; तालुक्यात हळहळ... | मराठा समाजाचे नेते एस. टी. सावंत यांचे निधन | भडगाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे पंचनामे सुरू | खुल्या जिल्हा कारागृहाला मंजुरी; बिलाखेड शिवारात होणार उभारणी | *खासगी पंटरमार्फत २० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळचे पोलिस हवालदार निलंबित* | *कॉफी शॉपच्या नावाखाली अश्लील चाळे; जळगावच्या 'हेवन कॅफे' मालकाविरुद्ध गुन्हा दाखल* | *दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या व गिरणा नदी पात्रावरील अवैध्य वाळूचा उपसा थांबवा या मागणीसाठी भाजपा किसान मोर्चा* *चे जिल्हाधिकारी यांना निवेदन* | चोरीस गेलेले १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; तासगाव पोलिसांची कारवाई १२७.१८ ग्रॅम सोन्याचे दागिने न्यायालयाच्या आदेशाने हक्कदाराच्या स्वाधीन | भूजल पातळी खालावली, शेतकऱ्यांची चिंता वाढली; रोहित पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्याची मागणी | ट्रक अडवून नऊ लाखांचा दरोडा; उमदी पोलिसांकडून चौघांना अटक : १७ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त |