"वीज बिल माफीच्या घोषणा आणि प्रत्यक्षात अंधाराचे साम्राज्य; शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत जवळ"

👤 सतीशकुमार पडोळकर | 📅 18 June 2026 | 👁 60 Views
"वीज बिल माफीच्या घोषणा आणि प्रत्यक्षात अंधाराचे साम्राज्य; शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत जवळ"
मंगळवेढा (प्रतिनिधी): एकीकडे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीज बिल माफीच्या घोषणा केल्या जात आहेत, तर दुसरीकडे मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात अपुरा व अनियमित वीज पुरवठा करून शेतकरी व ग्रामीण जनतेच्या जीवनाशी खेळ सुरू असल्याची तीव्र भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्याचबरोबर रात्रीच्या वेळी वीज बंद केल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच नागरिक उकाड्याने त्रस्त झालेले आहेत.
एकीकडे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीज बिल माफीच्या घोषणा केल्या जात आहेत, तर दुसरीकडे मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात अपुरा व अनियमित वीज पुरवठा करून शेतकरी व ग्रामीण जनतेच्या जीवनाशी खेळ सुरू असल्याची तीव्र भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. अन्यथा येत्या काळात याचे राजकीय व सामाजिक परिणाम सरकार आणि लोकप्रतिनिधींना भोगावे लागतील, असा संतप्त इशारा ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
"वीज बिल माफीच्या घोषणा आणि प्रत्यक्षात अंधाराचे साम्राज्य; शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत जवळ" | आरामबसमध्ये दारूचा साठा करूळ नाक्यावर पोलिसांचा दणका | चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत मधुरा बाईतचे यश | जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे ठरले देवदूत | पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महामार्ग दुतर्फा करणार वृक्ष लागवड | नांदगाव तिठा ते वरवडे सेंट उर्सुला स्कूलपर्यंत एसटी बस सेवा सुरु करा | शिव व्यापार व रोजगार सेनेच्या कोकण विभाग संपर्क प्रमुखपदी शंकर पार्सेकर यांची नियुक्ती | स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन - सुशांत नाईक यांचा इशारा | शिडवणे येथील जिल्हा परिषद शाळेत उत्साहात शाळा प्रवेशोत्सव व पूर्वतयारी मेळावा संपन्न | नाईक पेट्रोलियम वागदे येथे सी.एन.जी.पंप कार्यान्वित |