आरामबसमध्ये दारूचा साठा करूळ नाक्यावर पोलिसांचा दणका

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 18 June 2026 | 👁 1 Views
आरामबसमध्ये दारूचा साठा करूळ नाक्यावर पोलिसांचा दणका
करूळ तपासणी नाक्यावर पोलिसांनी पहाटे केलेल्या तपासणीदरम्यान एका आरामबसच्या सामान कक्षातून ३६ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली. याप्रकरणी बसचा क्लिनर सचिन बाबासाहेब ईरकर (वय २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करूळ तपासणी नाक्यावर पोलीस कर्मचारी संदीप राठोड आणि हरेष जायभाय हे सोमवारी सायंकाळपासून तपासणीसाठी तैनात होते. मंगळवारी पहाटे सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून वैभववाडीच्या दिशेने येणारी आरामबस (क्र. जीए ०८ व्ही ८३७७) तपासणीसाठी थांबविण्यात आली. यावेळी बस चालक दत्तात्रय ईतापे, अमोल कोंडाळकर आणि क्लिनर सचिन ईरकर यांना सामान कक्ष उघडण्यास सांगण्यात आले. दोन कक्षांची तपासणी केल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. मात्र, तिसरा सामान कक्ष उघडत नसल्याचे क्लिनरने सांगितल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी संबंधित कक्ष उघडण्यास सांगितल्यानंतर त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे तीन बॉक्स आढळून आले.
या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक फक्रुद्दीन आगा यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई केली. पोलिसांनी दारूसह एकूण ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक कारवाई पूर्ण केल्यानंतर आरामबस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. या प्रकरणी सचिन बाबासाहेब ईरकर याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
"वीज बिल माफीच्या घोषणा आणि प्रत्यक्षात अंधाराचे साम्राज्य; शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत जवळ" | आरामबसमध्ये दारूचा साठा करूळ नाक्यावर पोलिसांचा दणका | चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत मधुरा बाईतचे यश | जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे ठरले देवदूत | पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महामार्ग दुतर्फा करणार वृक्ष लागवड | नांदगाव तिठा ते वरवडे सेंट उर्सुला स्कूलपर्यंत एसटी बस सेवा सुरु करा | शिव व्यापार व रोजगार सेनेच्या कोकण विभाग संपर्क प्रमुखपदी शंकर पार्सेकर यांची नियुक्ती | स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन - सुशांत नाईक यांचा इशारा | शिडवणे येथील जिल्हा परिषद शाळेत उत्साहात शाळा प्रवेशोत्सव व पूर्वतयारी मेळावा संपन्न | नाईक पेट्रोलियम वागदे येथे सी.एन.जी.पंप कार्यान्वित |