रेरा प्रमाणपत्राची मुदत संपली; बार्शीतील PMAY प्रकल्पातील खरेदी-विक्री व्यवहार ठप्प

👤 दै.आखुर बार्शी | 📅 28 April 2026 | 👁 93 Views
रेरा प्रमाणपत्राची मुदत संपली; बार्शीतील PMAY प्रकल्पातील खरेदी-विक्री व्यवहार ठप्प

बार्शी : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) बार्शी नगरपालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या “राष्ट्रमाता जिजाऊ नगर” या भव्य गृहनिर्माण प्रकल्पावर सध्या अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. प्रकल्पाचे महाराष्ट्र रेरा (MahaRERA) प्रमाणपत्राची मुदत संपली आहे असून अद्याप त्याचे नूतनीकरण (renewal) करण्यात आलेले नाही.
या प्रशासकीय विलंबामुळे प्रकल्पातील प्लॅट खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक इच्छुक लाभार्थी संभ्रमात पडले आहेत. काहींनी आधीच आर्थिक व्यवहार केले असल्याने त्यांच्यासमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बार्शी दौऱ्याची चर्चा रंगत असताना, या प्रलंबित प्रकल्पाला ते भेट देणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नागरिकांची अपेक्षा आहे की, मुख्यमंत्री या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देतील आणि MahaRERA प्रमाणपत्र नूतनीकरण प्रक्रियेला गती देतील.
स्थानिकांकडून असा सवाल उपस्थित केला जात आहे की, शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत असलेल्या प्रकल्पांमध्येच जर अशा अडचणी येत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा कसा?
आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री दौऱ्याकडे लागले असून, या भेटीत “राष्ट्रमाता जिजाऊ नगर” प्रकल्पाच्या प्रश्नावर काही ठोस निर्णय होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |