रामटेक : विजयादशमीच्या पर्वानिमित्त रामटेकजवळील मानापूर येथील डिगी मैदान परिसरात श्रीराम सेनेतर्फे पारंपरिक रावण वधाचा कार्यक्रम मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला.
श्रीराम मंदिर, रामटेक येथून श्रीराम सेनेचा ‘निशान’ घेऊन मिरवणूक निघाली. सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या दरम्यान डिगी मैदान परिसरात मातीपासून तयार करण्यात आलेल्या रावणाच्या मूर्तीचे शीर धडावेगळे करून रावण वध करण्यात आला. त्यानंतर रावणाच्या मूर्तीमागे तयार करण्यात आलेल्या सूर्पणखेचाही वध करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही परंपरेनुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दसऱ्याच्या निमित्ताने पार पडलेल्या या कार्यक्रमातून रामायणातील प्रसंगांचे स्मरण करण्यात आले.