गुंडेवाडीतील खूनप्रकरणी सांगली एलसीबीची धडाकेबाज कामगिरी; मुख्य संशयितासह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
जुन्या भांडणाचा राग मनात धरून चाकू व कोयत्याने वार केल्याची कबुली; सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तातडीने कारवाई.
दैनिक आखुर / संतोष एडके सांगली
: मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे जुन्या भांडणाच्या रागातून सुनील उर्फ सोन्या तानाजी खांडेकर (वय ३१) या तरुणाचा चाकू व कोयत्याने वार करून खून केल्याच्या प्रकरणात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने कारवाई करत अनिरुद्ध सिद्धू कांबळे (वय १९, रा. गुंडेवाडी) याला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या संशयावरून एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी रात्री ८.४९च्या सुमारास गुंडेवाडी येथील सातपुते मळा परिसरातील ग्रीन हाऊसजवळ ही घटना घडली. सुनील खांडेकर हे जेवण करून घरातून शेताकडे जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर चाकूसदृश धारदार शस्त्राने डोके, पोट, पाठ, पाय व कपाळावर वार केले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना तातडीने ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी तीन पथके तयार केली.
दरम्यान, पोलीस हवालदार सुशील मस्के व पोलीस शिपाई ऋतुराज होळकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत संशयित आरोपी अंकली फाटा ते हरिपूर रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत अनिरुद्ध कांबळे याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत, मृत सुनील खांडेकर याच्याशी वारंवार भांडणे होत असल्याने मनात राग धरून आपण व आपल्या मित्राने त्याच्यावर पाळत ठेवली. तो घरातून शेताकडे जात असताना चाकू व कोयत्याने वार करून खून केल्याची कबुली अनिरुद्ध कांबळे याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी,
मा. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, मिरज विभाग, मिरज
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली; पोलीस निरीक्षक अमित पाटील, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे; सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार; पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील; पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार;
सपोफी सुभाष सूर्यवंशी, पोहेकॉ सुशील मस्के, संकेत मगदूम, अमोल ऐदाळे, इम्रान मुल्ला, सागर लवटे, संदीप नलवडे, नागेश खरात, राजाराम मुळे, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, विनायक सनदी, सुमीत सूर्यवंशी, प्रमोद साखरपे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.
पोहेकॉ हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे; पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, सायबर पोलीस ठाणे.
ताब्यात घेतलेल्या अनिरुद्ध कांबळे याला पुढील तपासासाठी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित पाटील करीत आहेत.