गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी संजयनगर पोलिसांचे गणेश मंडळांना मार्गदर्शन

👤 संतोष एडके तासगाव | 📅 31 August 2026 | 👁 15 Views
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी संजयनगर पोलिसांचे गणेश मंडळांना मार्गदर्शन
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी संजयनगर पोलिसांचे गणेश मंडळांना मार्गदर्शन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच उत्सव शांततापूर्ण, सुरक्षित व पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करण्यासाठी संजयनगर पोलिस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध सूचना व मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली.
दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या सुमारे १०० ते १२० पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे तसेच पोलिस निरीक्षक बजाजीराव कुरळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली.
बैठकीमध्ये गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध सूचना देण्यात आल्या. गणेश मंडळांनी आवश्यक परवानग्या प्राप्त करूनच उत्सवाचे आयोजन करावे, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करून निर्धारित वेळेतच ध्वनिक्षेपकांचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या.
मंडप, विद्युत व्यवस्था व सजावट करताना अग्निसुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात. सीसीटीव्ही कॅमेरे बसवून स्वयंसेवकांची नियुक्ती करीत सुरक्षा व्यवस्था सक्षम ठेवावी. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन कोणत्याही प्रकारचा छेडछाड अथवा गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
मिरवणुकीदरम्यान वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. सामाजिक सलोखा बिघडेल अथवा धार्मिक भावना दुखावतील, असे कोणतेही कृत्य करू नये. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य द्यावे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
संशयित व्यक्ती, वस्तू अथवा कोणतीही अनुचित बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच सोशल मीडियावर अफवा, आक्षेपार्ह किंवा दिशाभूल करणारे संदेश प्रसारित करू नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
गणेशोत्सव काळात संजयनगर पोलिसांकडून विशेष बंदोबस्त, गस्त, सीसीटीव्ही निरीक्षण तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. सर्व नागरिक, गणेश मंडळांचे पदाधिकारी व स्वयंसेवक यांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करून उत्सव आनंददायी, सुरक्षित व शांततेत पार पाडावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक बजाजीराव कुरळे यांनी केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |