रक्षाबंधन केवळ सण नाही, तर शेकडो वर्षांची परंपरा, संपूर्ण इतिहास

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 27 August 2026 | 👁 275 Views
रक्षाबंधन केवळ सण नाही, तर शेकडो वर्षांची परंपरा, संपूर्ण इतिहास
उद्या संपूर्ण देशात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, या सणाच्या मुळाशी असलेला हजारो वर्षांचा इतिहास अनेकांना माहिती नाही.या सणाची सुरुवात नेमकी कधी झाली याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद असले तरी, याचा पहिला उल्लेख महाभारत काळात आढळतो. भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली असता द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून त्यांच्या बोटाला बांधला होता. त्या एका धाग्याचे ऋण म्हणून श्रीकृष्णाने वस्त्रहरण प्रसंगी द्रौपदीचे रक्षण केले. तेव्हापासून हा बहीण-भावाच्या अतूट नात्याचा आणि रक्षणाचा सण बनला.ऐतिहासिक दृष्ट्या या सणाचा सर्वात मोठा पुरावा इ.स. 1535 मधला आहे. चित्तोडची राणी कर्णावती हिच्यावर गुजरातचा सुलतान बहादूरशहा याने हल्ला केला असता, राणीने दिल्लीचा मुघल सम्राट हुमायूं याला राखी पाठवून मदतीची याचना केली होती. हुमायूंनेही बहिण मानून तिच्या रक्षणासाठी धाव घेतली.तर 1905 साली बंगालच्या फाळणीच्या वेळी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी या सणाचा वापर हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी केला. त्यांनी सर्व धर्माच्या लोकांना एकमेकांना राखी बांधून एकतेचा संदेश देण्याचे आवाहन केले होते.
आज हा सण केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित न राहता, देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना, समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना राखी बांधण्यापर्यंत विस्तारला आहे. धागा एकच, पण भावना रक्षणाची.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात | जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल | जळगावात खून, दुचाकीचा किरकोळ वादातून तरुणाची हत्या, एक जखमी | मानापूर येथे श्रीराम सेनेतर्फे रावण वध; सूर्पणखेचाही वध | गुंडेवाडीतील खूनप्रकरणी सांगली एलसीबीची धडाकेबाज कामगिरी; मुख्य संशयितासह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात | ईश्वरपुरात रेकॉर्डवरील आरोपी पिस्तुलासह जेरबंद : सांगली एलसीबीची कारवाई. ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त; विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल. | पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मुद्रित जाहिरातींसाठी MCMC प्रमाणपत्र बंधनकारक - डॉ. मैनाक घोष |