कलमठमधील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात २३ पासून हरिनाम सप्ताह

👤 तुषार शिंगाडे | 📅 20 August 2026 | 👁 26 Views
कलमठमधील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात २३ पासून हरिनाम सप्ताह


कणकवली : कलमठ बाजारपेठ येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात दि. २३ ते २४ ऑगस्ट या कालावधीत हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रथेनुसार गावातील प्रत्येक वाडीतील भजन मंडळांकडून अहोरात्र भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पालखीची नगरप्रदक्षिणा काढण्यात येणार असून, त्यानंतर हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.

दरम्यान, बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात | जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल | जळगावात खून, दुचाकीचा किरकोळ वादातून तरुणाची हत्या, एक जखमी | मानापूर येथे श्रीराम सेनेतर्फे रावण वध; सूर्पणखेचाही वध | गुंडेवाडीतील खूनप्रकरणी सांगली एलसीबीची धडाकेबाज कामगिरी; मुख्य संशयितासह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात | ईश्वरपुरात रेकॉर्डवरील आरोपी पिस्तुलासह जेरबंद : सांगली एलसीबीची कारवाई. ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त; विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल. | पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मुद्रित जाहिरातींसाठी MCMC प्रमाणपत्र बंधनकारक - डॉ. मैनाक घोष |