कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार’ २०२६ श्रीमती वंदना करंबेळकर यांना जाहीर

👤 तुषार शिंगाडे | 📅 20 August 2026 | 👁 18 Views
कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार’ २०२६ श्रीमती वंदना करंबेळकर यांना जाहीर

आचरा येथील वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामबि. सह. पतसंस्था मर्या., आचरा या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार’ २०२६ यावर्षी सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वंदना श्रीकृष्ण करंबेळकर यांना जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती संस्थेचे चेअरमन मंदार सांबारी यांनी दिली.

कै. श्रीकांत सांबारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्काराचे वितरण करण्यात येत आहे. यावर्षीचा हा चौथा पुरस्कार असून, शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात श्रीमती वंदना करंबेळकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

शिक्षण, आरोग्य तसेच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून, त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे चेअरमन मंदार सांबारी यांनी सांगितले.

दरम्यान, दि. २५ ऑगस्ट रोजी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्रीमती वंदना करंबेळकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या या पुरस्कारामुळे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |