सांगोला तालुक्यातील नाझरे परिसरामधील अवैध धंद्यांमध्ये वाढ , तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी ग्रामस्थांचा कारवाईचा आग्रह

👤 अंकुश मुढे | 📅 16 August 2026 | 👁 162 Views
सांगोला तालुक्यातील नाझरे परिसरामधील  अवैध धंद्यांमध्ये वाढ , तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी ग्रामस्थांचा कारवाईचा आग्रह
नाझरे गाव सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने सांगोला तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव असून त्यामुळे या गावातील वातावरण शांत ठेवण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने अशा अवैध धंद्यांवर त्वरित आळा घालणे आवश्यक आहे. प्रशासनाने नियमित गस्त घालून कठोर पावले उचलावीत." स्थानिक नागरिक, नाझरे
नाझरे ( ता - सांगोला )

नाझरे गाव व लगतच्या परिसरात गेल्या काही वर्षापासून अवैध दारू विक्री, मटका आणि जुगाराचे अड्डे आहेत . या वाढत्या अवैध धंद्यांमुळे सामाजिक शांतता बाधित होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, गावातील प्रमुख परिसर आणि काही मोकळ्या जागांवर या बेकायदेशीर हालचाली चालतात. यामुळे तरुण वर्ग व मजुरांवर विपरीत परिणाम होत असून, सायंकाळच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या संदर्भात नागरिकांनी स्थानिक पोलिस ठाण्याकडे याबाबात गुन्हे नोंदवले जातात मात्र काही दिवसांनी तेच लोक पुन्हा आपले धंदे चालू करतात , या अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली आहे. काही ग्रामस्थांच्या मते, पोलिसांकडून अपेक्षित वेगाने किंवा कठोर स्वरूपाची कारवाई झालेली नाही. त्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाडस वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.



दरम्यान, सांगोला पोलिस स्टेशनचे नूतन पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे हे कशाप्रकारे कारवाई करणार अशी चर्चा सुरू आहे . या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन काय भूमिका घेते आणि परिसरात अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय ठोस उपाययोजना करते, याकडे संपूर्ण परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |