असलदे पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार नांदगावच्या पोलीस पाटलांकडे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे आदेश;

👤 तुषार शिंगाडे | 📅 15 August 2026 | 👁 27 Views
असलदे पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार नांदगावच्या पोलीस पाटलांकडे  तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे आदेश;


कणकवली : कणकवली तालुक्यातील असलदे गावातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार आता नांदगाव येथील पोलीस पाटील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबत कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी आदेश काढले आहेत. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने असलदे ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे.

असलदे ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावासाठी स्वतंत्र पोलीस पाटील व्यवस्था करावी अथवा जवळच्या गावातील पोलीस पाटलांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवावा, अशी मागणी करण्यात आली होती. यापूर्वी असलदे पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार कोळोशी येथील पोलीस पाटील संजय मारुती गोरुले यांच्याकडे होता. मात्र कोळोशी गाव अंतरावर असल्याने पोलीस पाटील दाखले तसेच अन्य आवश्यक कामांसाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने असलदे पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार नांदगाव येथील पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे असलदे ग्रामस्थांना विविध दाखले व पोलीस पाटील कार्यालयाशी संबंधित कामांसाठी होणारी गैरसोय कमी होणार आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त असलदे ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण करण्यात आले. देशसेवा करणाऱ्या भारतीय सैनिकांप्रती सद्भावना व्यक्त करण्यात आली. त्यानंतर प्रभारी पोलीस पाटील म्हणून वृषाली मोरजकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच चंद्रकांत डामरे व चेअरमन भगवान लोके यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपसरपंच सचिन परब, व्हा. चेअरमन दयानंद हडकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीकृष्ण परब, सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे, परशुराम परब, विजय आचरेकर, संतोष परब, विजय डामरे, महेश लोके, रघुनाथ लोके, अनिल नरे, प्रशांत परब, वासुदेव दळवी, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, बाबाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा दळवी, सपना डामरे, आनंदी खरात, विद्या आचरेकर, संतोष घाडी, सुदीन तांबे, एकनाथ डामरे, अनंत परब, गवस साटविलकर, तलाठी माधुरी काबरे, ग्रामसेवक संजय तांबे, कर्मचारी मधुसुदन परब, सत्यवान घाडी, प्रकाश वाळके, प्रतीक्षा परब, शिक्षक जंगले, शिक्षिका अर्चना लोके, विनिता सावंत, आशा सेविका भाग्यश्री नरे, अंगणवाडी सेविका कोमल परब आदी ग्रामस्थ व कृषीमित्र उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले.

ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन प्रशासकीय पातळीवर कार्यवाही केल्याबद्दल ग्रामस्थांनी कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे तसेच संबंधित प्रशासनाचे आभार मानले. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे असलदे पोलीस पाटील पदाचा प्रश्न मार्गी लागल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |