शिवसेना नगरसेवक ६ वर्षांसाठी अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 07 August 2026 | 👁 226 Views
शिवसेना नगरसेवक ६ वर्षांसाठी अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. मनमाड नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८-ब मधून नागरिकांच्या मागासवर्ग (ओबीसी) राखीव जागेवर निवडून आलेले शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक शेख मजीद इब्राहिम यांना ६ वर्षांसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भातील आदेश जारी केल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.मनमाड नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी शेख मजीद इब्राहिम यांनी जात प्रमाणपत्र वैधता पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. मात्र, नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. तसेच, कायद्यानुसार निश्चित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यातही ते अपयशी ठरल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १६ (१-ब)(अ) अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नगरपरिषदेच्या सदस्यपदासाठी सहा वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे.या निर्णयाची प्रत राज्य निवडणूक आयोग आणि मनमाड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आली आहे. या कारवाईनंतर मनमाड नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत असून, रिक्त झालेल्या जागेबाबत पुढे काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |