स्पर्धेत टिकण्यासाठी शासकीय नियमांची काटेकोर पालन करणे आवश्यक --राजू जठार

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 30 July 2026 | 👁 57 Views
स्पर्धेत टिकण्यासाठी शासकीय नियमांची काटेकोर पालन करणे आवश्यक --राजू जठार
संपूर्ण महाराष्ट्रात अन्नसुरक्षा प्रशिक्षण पुर्ण करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा ठरणार आहे. याचे सर्व श्रेय अन्न प्रशासन अधिकारी, महासंघ, तालुका ,ग्रामीण व्यापारी संघटनांच्या प्रयत्नांना जाते. बदलत्या धोरणानुसार आपणास स्पर्धेत टिकण्यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या नियमांची काटेकोर पालन करुन व्यवसाय केल्यास आपण स्पर्धेत टिकू शकतो असे मत सिंधुदुर्ग जिल्हा महासंघाचे सचिव राजू जठार यांनी आचरा येथे व्यक्त केले.
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व व्यापा-यांनी महासंघाचे सभासद होण्याचे आवाहन केले.
आदर्श व्यापारी संघटना आचरा तर्फे अन्न व्यावसायाशी संबंधित व्यापाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा अन्न सुरक्षा विषयक (फाॅस्टॅक )प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन हाॅटेल सिरॉक येथील लौकीक सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर,जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी, महासंघाचे माजी कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, जिल्हा कंजूमर प्राॅडक्ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनचे कार्यवाह विवेक नेवाळकर, शिवसेना उप जिल्हाप्रमुख महेश राणे,माजी सरपंच मंगेश टेमकर, प्रशिक्षक अंकुश जोगदंड,आचरा व्यापारी संघटना उपाध्यक्ष मंदार सांबारी,परेश सावंत, खजिनदार जयप्रकाश परूळेकर, संघटनेचे राजन पांगे, संदीप पांगम, गजानन गावकर, शैलेश वळंजू, सचिन गुळगुळे, सचिन हडकर,विकास साटम, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राजापूर येथील व्यावसायिक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रशिक्षक अंकुश जोगदंडे यांनी उपस्थितांना अन्न सुरक्षा नियमांबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसनही केले.या प्रशिक्षणाला आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस उपसरपंच संतोष मिराशी यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंदार सांबारी यांनी केले
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
स्पर्धेत टिकण्यासाठी शासकीय नियमांची काटेकोर पालन करणे आवश्यक --राजू जठार | आषाढी एकादशी निमित्त संकलन केलेल्या कपड्यांचे सविता आश्रम पणदुर येथे केले दान | "तुकाराम मुंढे यांना किमान दोन वर्षे अन्न व औषध प्रशासनात ठेवावे; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सुरू असलेल्या कारवायांना सातत्य द्यावे"आमदार सत्यजित दादा तांबे | १२ वर्षे... आश्वासन अधुरेच’; धनगर समाजाचा ‘विश्वासघात दिन’ साजरा, काळ्या पट्ट्या बांधून सरकारविरोधात तीव्र निषेध | सांगली ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई : सांडपाणी योजनेवरील साहित्य चोरी करणारी टोळी जेरबंद; ₹६९ हजारांचा मुद्देमाल जप्त | बीड दौऱ्यावर ना. पंकजाताई मुंडे; जिल्हा नियोजन समिती बैठकीसह जनसंपर्क व विविध कार्यक्रमांना उपस्थिती | संवाद,संस्कार आणि शिक्षणाचे नाते जपा – साहित्यिक अजय कांडर | स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालय सांगुळवाडी वैभववाडी येथे वृक्षारोपण | सागरमाला २.० अंतर्गत महाराष्ट्रातील प्रकल्पांना मंजुरी मिळण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा | सेवानिवृतानी बचत खाते पेन्शन खात्यात बदलून सी.पी.पी. योजनेचा लाभ घ्यावा |