आषाढी एकादशी निमित्त संकलन केलेल्या कपड्यांचे सविता आश्रम पणदुर येथे केले दान
👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग |
📅
30 July 2026 |
👁 64 Views
आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट पळसंबने वापरण्या योग्य कपडे देवस्थान ट्रस्टकडे ग्रामस्थांनी संकलित करावे आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. हे संकलित केलेल कपडे श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट पळसंबने गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आनंद संस्था संचालित संविताश्रम पणदूर आश्रम संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांच्याकडे प्रदान केले. संदिप परब यांनी संस्थे विषयी सविस्तर माहिती देत देवालय ट्रस्ट चे आभार मानले. व ट्रस्ट आणि पळसंब गावासाठी आपली नेहमी सहकार्य करण्याचा शब्द दिला. यावेळी देवालय ट्रस्ट अध्यक्ष मेघ:श्याम गोलतकर, सचिव मधुकर कदम, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, पळसंब पोलीस पाटील अनुष्का परब, जंयतीदेवी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत, सत्यवान सावंत, दिपेश घाडी, पुरुषोत्तम साईल, प्रथमेश परब, भुवन परब, अविराज परब, देऊ सावंत आदी उपस्थित होते