सेवानिवृतानी बचत खाते पेन्शन खात्यात बदलून सी.पी.पी. योजनेचा लाभ घ्यावा

👤 बळीराज भराडे परभणी | 📅 29 July 2026 | 👁 260 Views
सेवानिवृतानी बचत खाते पेन्शन खात्यात बदलून सी.पी.पी. योजनेचा लाभ घ्यावा
स्टेट बँक ऑफ इंडियातील सेवानिवृत्त खातेदारांनी बचत खाते बदलून पेन्शन खाते करावे व सी पी पी योजनेचा लाभ घ्यावा " असे आवाहन जिंतूर बँकेचे मुख्य व्यवस्थापक पवनकुमार शहा यांनी केले.
ते पेन्शनर ग्राहक मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना बँकेचे फिल्ड ऑफिसर प्रजय साळवे म्हणाले " सेवानिवृत्त खातेदार यांना सी पी पी योजनेद्वारे अनेक लाभ मिळतील. प्रामुख्याने मिनिमम बॅलेन्स अट शिथिल, निशुल्क एस एम एस, ए टी एम, पेन्शन स्लीप, इंटरनेट बँकिंग सेवा, उपलब्ध होईल. दहा ते तीस लाख पर्यंत वैयक्तिक अपघात विमा, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी दहा लाख पर्यंत कर्ज सुविधा, कुटुंबियांच्या प्रवासासाठी मदत, दहा लाख पर्यंत एअर ऍम्ब्युलन्स सुविधा, सवलतीच्या दरात लॉकर सुविधा, आदी लाभ सी पी पी योजने द्वारे उपलब्ध होईल. "
कार्यक्रमाचे अध्यक्ष एम के कादरी यांनी, " इतर बँकेतील सेवानिवृत्त खातेदारांनी सी पी पी योजनेच्या लाभासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आपले खाते उघडून पेन्शन सुरु करावी, " असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा सचिव शिरीष लोहट यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमचे प्रमुख पाहुणे म्हणून चाटे आर बी व्यवस्थापक, पंकज चव्हाण फिल्ड ऑफिसर, जिल्हा सचिव शिरीष लोहट, परभणी तालुकाध्यक्ष नरसिंग इतबारे हे होते. यावेळी सेवानिवृताना सहकार्य करणारे कर्मचारी रमेश संगेकर यांचाही संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गरगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हा मेळावा महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी जिल्हा शाखा परभणी व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जिंतूरच्या संयुक्त विध्यमाने आयोजित करण्यात आला.
आभार प्रदर्शन टी के चव्हाण यांनी केले
कार्यक्रमासाठी संयोजक बाळासाहेब गरगडे होते कार्यक्रमात कैलास कपाळे, गणपत बिल्लारी, गजानन जुनघरे, ज्ञानोबा गट्टेवाड, परसराम पवार, पंडित शिसोदे, नाथा खंदारे यांनी सहकार्य केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
स्पर्धेत टिकण्यासाठी शासकीय नियमांची काटेकोर पालन करणे आवश्यक --राजू जठार | आषाढी एकादशी निमित्त संकलन केलेल्या कपड्यांचे सविता आश्रम पणदुर येथे केले दान | "तुकाराम मुंढे यांना किमान दोन वर्षे अन्न व औषध प्रशासनात ठेवावे; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सुरू असलेल्या कारवायांना सातत्य द्यावे"आमदार सत्यजित दादा तांबे | १२ वर्षे... आश्वासन अधुरेच’; धनगर समाजाचा ‘विश्वासघात दिन’ साजरा, काळ्या पट्ट्या बांधून सरकारविरोधात तीव्र निषेध | सांगली ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई : सांडपाणी योजनेवरील साहित्य चोरी करणारी टोळी जेरबंद; ₹६९ हजारांचा मुद्देमाल जप्त | बीड दौऱ्यावर ना. पंकजाताई मुंडे; जिल्हा नियोजन समिती बैठकीसह जनसंपर्क व विविध कार्यक्रमांना उपस्थिती | संवाद,संस्कार आणि शिक्षणाचे नाते जपा – साहित्यिक अजय कांडर | स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालय सांगुळवाडी वैभववाडी येथे वृक्षारोपण | सागरमाला २.० अंतर्गत महाराष्ट्रातील प्रकल्पांना मंजुरी मिळण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा | सेवानिवृतानी बचत खाते पेन्शन खात्यात बदलून सी.पी.पी. योजनेचा लाभ घ्यावा |