आयुर्वेदतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सात्त्विक, हलका आहारच योग्य

👤 आशुतोष फसाले | 📅 19 July 2026 | 👁 106 Views
आयुर्वेदतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सात्त्विक, हलका आहारच योग्य
आषाढात उपवासाला साबुदाणा-बटाटा टाळा

आषाढ महिन्याची सुरुवात होताच अनेक घरांमध्ये चातुर्मास, एकादशी, सोमवार, गुरुवार अशा विविध धार्मिक व्रत-वैकल्यांना प्रारंभ होतो. श्रद्धा म्हणून उपवास केला जात असला, तरी तो प्रत्येकासाठी सारखाच लाभदायी ठरेल, असे नाही. वय, प्रकृती, दैनंदिन शारीरिक श्रम, आधीपासून असलेले आजार आणि हवामान यांचा विचार न करता दिवसभर उपाशी राहणे शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. या काळात साबुदाणा, बटाटा, तळलेले आणि गोड पदार्थ टाळून हलका, सहज पचणारा आणि संतुलित आहार घेण्याचा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिला.

सात्त्विक, हलका आहार घ्या
* राजगिरा, शेंगदाणे, खोबरे, गूळ, रताळे आणि दूध यांचा आहार लाभदायक.
* सफरचंद, केळी यांसारखी हंगामी फळे आणि फलाहार घ्या.
* शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी नारळ पाणी आणि ताक प्यावे.
* उपवास सोडताना (पारण करताना) मूग डाळीच्या खिचडीसारखा सहज पचणारा आहार.

उपवास सोडताना हलका आहार घ्या
"उपवास हे केवळ धार्मिक आचरण नसून ते एक शास्त्रीय आरोग्यशास्त्र आहे. फलाहार, नारळ पाणी किंवा ताक या सात्त्विक पदार्थांचे सेवन पथ्यकारक ठरते. उपवास सोडताना जड आहार न घेता मूग डाळीच्या खिचडीसारखा हलका आहार घेणे योग्य ठरेल."
अर्जुन दबडे, आयुर्वेदाचार्य

पचनास जड आहार टाळा
उपवासाला केवळ साबुदाणा, बटाटा यांवर अवलंबून राहू नका.
भजी, वडे असे अति तळलेले आणि अतिस्निग्ध पदार्थ टाळा.
बाहेरचे किंवा अतिगोड, जड पदार्थ टाळा.
मसालेदार पदार्थ खाल्ले, तर पोटात जळजळ, ॲसिडिटी होईल.

केवळ श्रद्धा नको, प्रकृतीचाही विचार करा
"आषाढ काळात पचनशक्ती कमी होते. उपवास करताना श्रद्धेसोबत स्वतःची प्रकृती, वय आणि आजार यांचा विचार करा. दिवसभर उपाशी राहण्यापेक्षा हलका आहार घ्यावा, थोडे-थोडे कोमट पाणी प्या. राजगिरा, शेंगदाणे, खोबरे, गूळ, रताळे, दूध आणि फळे शरीराला ऊर्जा देतात. तेलकट पदार्थ टाळा."

अमित मिसाळ, आयुर्वेदाचार्य
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा |