रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 25 July 2026 | 👁 152 Views
रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद
उमाबाई बर्वे लायब्ररी, देवगड आणि तालुका पेन्शनर्स असोसिएशन, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'मुक्तसंवाद' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या पाचव्या पुष्पात देवगड येथील ज्येष्ठ संगीतकार, संगीत शिक्षक व देवगड आर्ट सर्कल संस्थेचे अध्यक्ष संगीत विशारद प्रसादजी शेवडे सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता ग्रंथालयानजिक असलेल्या स्नेहसंवर्धक मंडळाच्या सभागृहात संपन्न होणार आहे.
शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रसादजी शेवडे यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण कुडाळ येथे घेतले. त्यानंतर पणजी येथील कला अकॅडमीमधून संगीत विशारद पदवी संपादन केली. पुढे मुंबई येथे प्रख्यात गायक पंडित प्रभाकर कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शास्त्रीय संगीताचे अधिक सखोल शिक्षण घेतले.
शास्त्रीय गायनाबरोबरच सुगम संगीत, भजन, नाट्यगीत, भक्तिगीत, भावगीत, गवळण अशा विविध संगीतप्रकारांमध्ये त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तसेच अनेक नामवंत कीर्तनकार व गायकांना हार्मोनियम आणि ऑर्गन वादनाची साथ करण्याची संधीही त्यांना लाभली आहे. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
या कार्यक्रमात श्री. प्रसादजी शेवडे यांच्या संगीतमय प्रवासाचा आणि संगीत क्षेत्रातील अनुभवांचा उलगडा प्रमोदजी नलावडे हे त्यांच्याशी मुक्तसंवाद साधत करणार आहेत. त्यामुळे संगीतप्रेमींना त्यांच्या समृद्ध कलाप्रवासाची जवळून ओळख करून घेण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमास संगीत रसिक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन उमाबाई बर्वे लायब्ररीचे अध्यक्ष डॉ. गुरुदेव परुळेकर आणि तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र हिंदळेकर यांनी केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा | सर्व दिंडी सोहळे पंढरपूर नगरीमध्ये दाखल" |